SKP Jayant Patil : विधान परिषदेत मोठा पराभव झाल्यानंतर जयंत पाटील संतप्त; म्हणाले..

MLC Election : ठाकरेंना शिंदे गटाची तर शरद पवार गटाला अजित पवार गटाची मते फोडता आलेली नाहीत.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला मोठा 'धप्पा' दिला. महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना सामोरे जावं लागलं आहे.

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. पण, आवश्यक मते नसतानाही ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वपक्षीच्या नेत्यांच्या संबंधाच्या जोरावर विजय मिळवला.

11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात होता. पण, एकाचे 'बारा' वाजणार हे नक्की होते. मात्र, हे 'बारा' कुणाचे वाजणार हे निकालानंतर स्पष्ट होणार होते. मात्र, शेकापचे जयंत पाटील Jayant Patil यांचा पराभव झाल्यानं महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

मतमोजणी सुरू होताच भाजपसह, ठाकरे गट, काँग्रेसने आघाडी घेतली. मात्र जयंत पाटील यांना सुरुवातीपासूनच कमी मते मिळाली. त्यांना पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सर्व उमेदवार आघाडी घेत असताना जयंत पाटील यांना फक्त ८ मते मिळाली होती.

सर्वात कमी मते पाहून त्यांनी विधिमंडळातून काढता पाय घेतला. तर दुसऱ्या पसंतीच्या मतानंतरही त्यांना फक्त १२ मतांवरच समाधान मानावे लागले. हा जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Jayant Patil
Pune BJP Politics : विधान परिषदेत 'पहिली पसंत' पुणे, पिंपरी चिंचवडला; योगेश टिळेकर, अमित गोरखेंचा दणक्यात विजय

या पराभवानंतर जयंत पाटील चांगलेच संतप्त झाले. ते म्हणाले, "माझ्या हक्काची बारा मते मला मिळालेली आहेत. तर काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटल्याने हा प्रकार घडला आहे, असे सांगून पाटील यांनी पुढे बोलण्यास नकार दिला. त्यामुळे विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडीत कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी महाविकास आघाडीवल सडकून टीका केली. शेकपच्या जयंत पाटलांचा आघाडीतील तिन्ही पक्षाने मिळून पराभव केल्याचा आरोप त्यांनी केला. मते फुटल्यानेच पाटील यांचा पराभव झाला. त्यांची रणनीती चुकल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. तर जयंत पाटील यांच्या पराभवानंतर सत्यजीत तांबे यांनी खंत व्यक्त केली.

काँग्रेसची आठ मते फुटली

लोकसभेला चांगले यश मिळवल्यानंतर विधान परिषदेत मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत काँग्रेस आणि आघाडी होती. मात्र काँग्रेसचीच आठ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित आमदारांची हाकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Jayant Patil
Milind Narwekar Victory : उद्धव ठाकरेंचे 'राइट हॅन्ड' अन् 'अजातशत्रू' मिलिंद नार्वेकर विजयी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com