Chitta Ranjan Dash News
Chitta Ranjan Dash News Sarkarnama
प्रशासन

Chitta Ranjan Dash News : मी RSS चा सदस्य! निवृत्तीच्या भाषणातच न्यायाधीशांची कबुली...

Rajanand More

Kolkatta RSS News : कलकत्ता हायकोर्टातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यांनी त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता काही दिवसांतच याच हायकोर्टातून आणकी एक न्यायाधीश निवृत्त झाले असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता यावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Chitta Ranjan Dash News)

कलकत्ता हायकोर्टातील (Calcutta High Court) न्यायाधीश चितरंजन दास हे सोमवारी (ता. 20) निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी कोर्टातील इतर न्यायाधीश व वकिलांनी एकत्रितपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दास यांनी निरोपाचे भाषणही केले. या भाषणात त्यांनी RSS शी संबंधांबाबत कबुली दिली. (Latest Marathi News)

दास म्हणाले, काही लोकांना चांगले वाटणार नाही पण मला इथे कबुली द्यावी लागेल की, मी RSS चा सदस्य होतो आणि आजही आहे. मी साहस, प्रामाणिक राहणे आणि दुसऱ्यांविषयी समान दृष्टकोन ठेवण्याबरोबरच देशभक्तीविषयी शिकलो आहे. आपल्या कामामुळे मी जवळपास 37 वर्षे संघटनेपासून लांब राहिल्याचेही दास यांनी सांगितले. (West Bengal Politics)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघटनेत सदस्य असल्याचा उपयोग मी करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी केला नाही, असे सांगत दास म्हणाले, हे सगळ तत्वांच्या विरोधात आहे. मी सर्व लोकांसोबत समान व्यवहार केला. श्रीमंत, कम्युनिस्ट, भाजप किंवा तृणमूल काँग्रेस (TMC) असा भेदभाव केला नाही. जीवनात काहीच चूक केली नाही. त्यामुळे मी संघटनेशी जोडलेला असल्याचे सांगण्याचे धाडस करू शकलो.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वीच कलकत्ता हायकोर्टातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय (Abhijeet Gangopadhyay) यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी काही तासांतच भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारीही मिळवली. त्यावरून तृणमूल काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी भाजप व गंगोपाध्याय यांच्यावर टीका केली होती. गंगोपाध्याय यांनी त्यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगाल सरकारने घेतलेले काही निर्णय बेकायदेशीर ठरवत त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT