Sambit Patra News : भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त! वादग्रस्त विधानानंतर संबित पात्रांचा आत्मक्लेश

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच संबित पात्रांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. त्यावरून नवीन पटनायक यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
PM Narendra Modi in Puri
PM Narendra Modi in PuriSarkarnama

Odisha Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र, भाजपचे नेते व उमेदवार संबित पात्रा (Sambit Patra News) यांच्या एका विधानाने भाजपला बॅकफूटवर गेले आहे. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. या विधानाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

संबित पात्रा हे पुरी लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election Update) भाजपचे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) रोड शोही झाला. एकीकडे पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू असताना पुरीमध्ये मोदींच्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. पण पात्रा यांच्या भगवान जगन्नाथ आणि मोदींविषयीच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. (Sambit Patra Controversy)

PM Narendra Modi in Puri
BJP Politics: ना प्रचारात सहभाग, ना मतदान केलं; भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याला नोटीस

पात्रा यांनी एका चॅनेलशी बोलताना भगवान जगन्नाथ (Lord Jagannath) हे मोदींचे भक्त असल्याचे विधान केले होते. त्यावरून टीका होऊ लागल्यानंतर पात्रांनी माफी मागितली आहे. मोदींच्या रोड शोनंतर मी अनेक मीडिया चॅनेलला मुलाखत दिली. प्रत्येकवेली मी मोदी हे भगवान जगन्नाथ यांचे भक्त असल्याचे म्हटले होते. पण एका चॅनेलवर बोलताना त्याच्या उलट मी म्हटले. हे माझ्याकडून चुकून झाले, असा खुलासा पात्रांनी केला आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन दिवस उपवास करणार

पात्रा यांनी आपल्या विधानावरून माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी महाप्रभू श्री जगन्नाथ यांच्या चरणी माथा टेकवून माफी मागत आहे. ही चूक सुधारण्यासाठी आणि पश्चाताप म्हणून मी तीन दिवस उपवास करणार आहे, असेही पात्रा यांनी म्हटले आहे.

ओडिया आस्थेचा अपमान

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी पात्रांवर टीका केली आहे. ते म्हणाले, श्री जगन्नाथ हे ब्रम्हांडाचे भगवान आहेत. महाप्रभू हे एखाद्या व्यक्तीचे भक्त आहेत, असे म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान आहे. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. जगभरातील कोट्यवधी जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या आस्थेचा अपमान झाला आहे.

मोदींनी मागावी माफी

पात्रांच्या विधानानंतर काँग्रेसने (Congress) भाजपवर निशाणा साधला आहे. पात्रांचे विधान महाप्रभूंचा घोर अपमान करणारे आहे. या विधानामुळे कोट्यवधी भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत. मोदींच्या भक्तीत बुडून गेलेल्या पात्रांनी असे करायला नको होते. त्यांनी पाप केले आहे. नरेंद्र मोदींनीच या विधानावर माफी मागायला हवी, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

PM Narendra Modi in Puri
Rahul Gandhi News : बालेकिल्ल्यातच राहुल गांधींवर नाराजी, 'जय श्रीराम'च्या घोषणेनंतर हात जोडून फिरले माघारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com