Coast Guard Recruitment  Sarkarnama
प्रशासन

Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 नाविक पदांची भरती; कसा कराल अर्ज?

Anand Surwase

Job Recruitment 2024 : भारतीय संरक्षण दलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना तटरक्षक दलामध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदाच्या रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी तटरक्षक दलाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, भरती प्रक्रिया आणि नियम अटी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. (Indian Coast Guard Force Recruitment 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदाच्या एकूण 260 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. नाविक पदांच्या या भरतीसाठी 12 विज्ञान शाखेचे (CBSE) विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच नाविक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 आणि कमाल 22 वर्षांपर्यंत असावे. यासाठी उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 आणि 30 ऑगस्ट 2006 या कालावधीमध्ये झालेला असावा. यामध्ये SC/ST उमेदवारांना 05 आणि OBC उमेदवारांना 03 वर्षांची अधिकची सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.indiancoastguard.gov.in ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीचा अर्ज सादर करताना उमेदवाराचा फोटो लाइव्ह कॅप्चर करून अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज भरताना उमेदवाराने प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी खुला आणि ओबीसीसाठी 300/ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

तटरक्षक दलामध्ये नाविक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही 60 गुणांची असेल. यामध्ये उमेदवाराने किमान 50 % गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक चाचणीसाठी उमेदवाराची किमान उंची 157 सेमी असावी. या शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराला 1600 मीटर धावणे, 20 बैठका आणि 10 पुशअप्स अशा पद्धतीने चाचणी घेतली जाणार आहे. या भरतीसंदर्भात उमेदवाराने अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तटरक्षक दलाची अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/assets/img/news/CGEPT01-2024adv.pdf

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT