Job Opportunity In Union Bank : युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी; 606 जागांची बंपर भरती!

Job Opportunity In Union Bank : 'कसा करणार नोकरीसाठी अर्ज?'
Job Opportunity In Union Bank
Job Opportunity In Union Bank Sarkarnama
Published on
Updated on

Bank Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. युनियन बँकेकडून विविध पदांच्या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरभरतीसाठी शैक्षणिक पात्रता, नियम-अटी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Latets Marathi News)

Job Opportunity In Union Bank
Job Opportunity In IDBI : 'आयडीबीआय' मध्ये सहायक व्यवस्थापक पदांची बंपर भरती; 500 जागा भरणार!

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 606 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार चीफ मॅनेजरची 5 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच सीनिअर मॅनेजर पदाच्या एकूण 42 जागा भरण्यात येणार असून, यासाठी उमेदवार हा BSc./B.E./B.Tech. किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास किमान अनुक्रमे 10 आणि 7 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

याशिवाय बँक व्यस्थापक पदाच्या 451 जागा आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या 108 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे, तर सहायक पदासाठी अनुभावाची गरज नाही. दरम्यान, शैक्षणिक पदवी प्राप्त उमेदवारास किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Job Opportunity In Union Bank
Teacher Recruitment : रयत शिक्षण संस्थेकडून 808 शिक्षकांची मेगा भरती; आत्ताच अर्ज करा

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्य व्यवस्थापक पदासाठी 30 ते 45, वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 28 ते 38 वर्षे, तसेच व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापकासाठी 25 ते 30 वर्षे वयाची मर्यादा आहे. तसेच सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये कमाल 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) 3 वर्षे अधिकच्या वयाची सूट देण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी बँकेच्या अधिकृत संकेत स्थळास (https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx) भेट देऊन सर्व प्रक्रिया जाणून घ्यावी.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा असून, अर्जासोबत शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासंदर्भातील आवश्यक माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 175 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँकेने प्रसिद्ध केलीली जाहिरात पाहावी. जाहिरात लिंक -https://drive.google.com/file/d/18VUZ2QysIdW3lx3TJ2rV2aXS6byfLw1Z/view

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com