Food and Drug Administration Sarkarnama
प्रशासन

Food and Drug Administration : औषधे विक्रेते डॉक्टर रडारवर; अन्न व औषध प्रशासन करणार कारवाई

Food and Drug Administration will take action against doctors who sell medicines : रुग्णाची तपासणी केल्यानंतर काही डॉक्टर ओपीडीतून औषधे विकतात. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे औषधे विकणार्‍या डॉक्टरांची तक्रार केली.

Pradeep Pendhare

FDA News : रुग्णाची तपासणी झाल्यावर डॉक्टर त्याला औषधे लिहून देतात. तसे ते सर्वमान्य असते. औषध प्रचारासाठी सॅम्पल मिळालेले औषध रुग्णाला मोफत देण्याची मुभा देखील डॉक्टरांना आहे. पण काही डॉक्टरांनी आपल्या ओपीडीतून औषधे विकण्याचा धंदा सुरू केला आहे.

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने, याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) औषधे विकणार्‍या डॉक्टरांची तक्रार केली. या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेत कारवाईच्या रडारवर घेतले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यात, अशी तपासणी मोहीम सुरू झाली आहे. 14 ऑगस्टपर्यंत, अशी तपासणी करण्याचा आदेश एफडीए प्रशासनाकडून निरीक्षकांना देण्यात आलेत. प्रत्येक औषध निरीक्षकाला किमान 10 डॉक्टरांची तपासणी करण्याच्या सूचना आहेत. परंतु डॉक्टरांनी तपासणीला आक्षेप घेतला आहे. मेडिकल (Medical) स्टोअरमध्ये औषधाचे बिल न देता होणारा काउंटर सेल आणि अ‍ॅमेझॉनपासून अन्य बड्या कंपन्यांद्वारे ऑनलाईन होणारी औषधे विक्रीला चाप कधी बसणार, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 च्या अनुसूचीनुसार उल्लंघन होत असल्याचे तक्रारी आहेत. शेड्युल के अंतर्गत येणारी अनेक औषधे स्थानिक डॉक्टरांकडून त्यांच्याकडे येणार्‍या व बाहेरून येणार्‍या रुग्णांना विकली जात आहे, याकडे महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने 'एफडीए'चे लक्ष वेधले आहे. डॉक्टरांनी मेडिकल दुकानदारांप्रमाणेच औषधांचा साठा केला आहे. यातून नियमांचे उल्लंघन होत आहे. या औषध खरेदीच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. बिलाविना औषधांची विक्री होते. मोफत मिळणार्‍या औषधांच्या नमुन्यांचीही विक्री केली जात आहे, असे देखील तक्रारीत म्हटले आहे.

'एफडीए'कडून कडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक फिजिशियनकडे असलेल्या औषधांच्या साठ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची भूमिका घेतलीय. या औषधांचा वापर दवाखान्यात येणार्‍या रुग्णांऐवजी इतर रुग्णांकरिता होत आहे का, काही डॉक्टर फार्मासिस्टप्रमाणे औषधे देतात का, हे तपासून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याची भूमिका अन्न व औषध प्रशासनाने घेतली आहे.

नियमांचे उल्लंघन

या तपासणीवर ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. रुग्णांचे मोठे नुकसान होणार असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय निर्धारित औषधांची विक्री करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. आपल्या रुग्णांना तसेच बाहेरील रुग्णांना केमिस्ट म्हणून विकणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असा त्यांचा दावा आहे.

ऑनलाईन विक्री सुरूच

केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने मध्यंतरी ऑनलाईन औषध विक्रीवर आक्षेप घेतला होता. मात्र, अशी विक्री बंद झालेली नाही व अजूनही सुरू आहे. त्यावर तसेच औषध दुकानांतून काउंटरवर होणारी औषध विक्री बंद करण्याची गरज डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT