Akash Fundkar meeting Sarkarnama
प्रशासन

contract workers Maharashtra : कंत्राटी कामगारांना दिलासा! महायुती सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Akash Fundkar on contract workers : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला 'तो' मसुदा ज्याची होती सर्व कंत्राटी कामगारांना प्रतीक्षा

Mayur Ratnaparkhe

equal pay for equal work : कंत्राटी कामगारांसाठी एक मोठा निर्णय़ महायुती सरकारकडून घेण्यात आलेला आहे. समान कायदा आण समान वेतन लागू करण्याचा जो मसुदा आहे, तो आता जाहीर झालेला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतचा मसुदा आता जाहीर केलेला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. समान काम, समान वेतन असणार आहे.

श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने वेतन वाढीच्या अधिसूचनेचा मसूदा ६ मार्च रोजी जाहीर केलेला आहे. नवी मुंबई महापालिका व नवी मुंबई परिवहन सेवेतील कंत्राटी, रोजंदारी, ठोक व करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीचा विश्वासार्ह रोडमॅप -

महायुतीच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आकाश फुंडकर(Akash Fundkar) म्हणाले होते की, ‘’महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा दूरदर्शी, समतोल आणि सर्वसमावेशक आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, औद्योगिक गुंतवणूक, शेती व शेतीपूरक व्यवसाय, आरोग्य सेवा, सामाजिक कल्याण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यावर विशेष भर देतो.’’

 तसेच, ‘’राज्यातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत असून, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल साधत, नव्या संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला एक विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर राज्य बनवण्याच्या दिशेने ठोस पाऊल आहे.’’ अशी प्रतिक्रिया आकाश फुंडकर यांनी दिली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT