BJP B-Team : भाजपची बी- टीम कोण? तापलं गोव्याचं राजकारण; 'AAP'चा 'रिव्हॉल्युशनरी गोवन्स'वर पलटवार!

Goa politics : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांनी गोव्यात स्वबळाचा नारा दिला आहे.
Amit Palekar
Amit Palekarsarkarnama
Published on
Updated on

AAP vs Revolutionary Goans : 'रिव्हॉल्युशनरी गोवन्स भाजपची बी - टीम असल्याचा आरोप केला जात होता. पण, आतिषी यांच्या एकला चलो रेच्या नाऱ्याने बी टीम कोण हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने याचा विचार करुन येत्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावे', असे रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे प्रमुख मनोज परब म्हणाले होते. यावरुन आता 'आप'चे गोवा संयोजक अमित पालेकरांनी मनोज परब यांच्यावर पलटवार केला आहे.

"मनोज परब यांचे बरोबर आहे ते भाजपची(BJP) बी-टीम नाहीत तर त्यांची भाजपसोबत युती आहे. ते हुर्राक हंगामासारखे आहेत. ते कितीवेळा बाहेर येतात आणि बोलतात हे तपासून पहा", अशी टीका आप नेते अमित पालेकरांनी केली आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी(Atishi) यांनी गोव्यात स्वबळाचा नारा दिला आहे. आतिषी यांच्या 'एकला चलो रे'च्या नाऱ्यानंतर भाजपची बी - टीम कोण याचा गोमंतकीय जनतेने विचार करावा, असे मनोज परब यांनी म्हटले होते. यावरुन आता आम आदमी पक्षाने मनोज परब यांच्यावर पलटवार करत ते हुर्राक हंगामासारखे असल्याचा आरोप केला आहे.

Amit Palekar
fake Amit Shah son : अमित शहांचा मुलगा असल्याचे भासवून मणिपूरच्या आमदारांकडे मागितले चार कोटी; तिघांना अटक!

'काँग्रेसवर(Congress) विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, त्यांच्या आठ आमदारांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येत्या पालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभेसाठी काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच नाही', असे वक्तव्य आतिषी यांनी गोव्यात केले होते. यानंतर मनोज परब यांनी आप भाजपची बी -टीम कोण हे स्पष्ट झाल्याचे म्हटले होते.

Amit Palekar
Kerala Love Jihad cases : ''केरळच्या 'या' तालुक्यात 400 मुली ठरल्या ‘लव्ह जिहाद’च्या बळी'' ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ!

दरम्यान, काँग्रेसने याबाबत भूमिक मांडताना युतीबाबत योग्य निर्णय निवडणुका जवळ आल्यानंतर घेतला जाईल. पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करुन निर्णय घेतील. काँग्रेसने राज्यातील ४० मतदारसंघात पक्षाला बळकटी देण्याचे काम सुरु केले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी म्हटले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com