New Delhi : मुंबईतील एका लाच प्रकरणात सीबीआयने चौकशी केलेल्या ED च्या अधिकाऱ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले. अलोक कुमार रंजन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. दिल्लीतील साहिबाबादमधील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
अलोक कुमार हे मुळचे गाझियाबादचे असून नवी दिल्लीत ईडी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर होते. त्याआधी ते प्राप्तिकर विभागात कार्यरत होते. सीबीआयने त्यांची भ्रष्टाचार प्रकरणात दोनदा चौकशी केली होती. मात्र, पुराव्यांअभावी नंतर त्यांची चौकशी थांबवण्यात आली होती. त्यांना अटकही करण्यात आली नव्हती.
ईडीचे सहायक संचालक संदीप सिंग यांना सीबीआयने एका लाच प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान अलोक कुमार यांचे नाव पुढे आले होते. सीबीआयकडे एका व्यक्तीकडून तक्रार करण्यात आली होती. त्याच्या मुलाला अटक करू नये, यासाठी सिंग यांनी 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर दिल्लीत 20 लाखांची लाच स्वीकारताना सिंग यांना रंगेहात अटक करण्यात आली होती.
सिंग यांनी मुंबईतील एका ज्वेलर्सकडूनही लाच घेतल्याचा आरोप होता. या ज्वेलर्सवर ईडीने रेड टाकली होती. याच प्रकरणात अलोक रंजन यांचेही नाव संदीप सिंग यांच्यासोबत एफआयआरमध्ये होते. सिंग यांना त्यानंतर सेवेतून निलंबित करण्यात आले होते, असे 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, अलोक कुमार रंजन यांची कथित आत्महत्येची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, कुणाचा दबाव होता का, असे अनेक प्रश्न यानिमित्ता उभे राहिले आहेत. दिल्ली पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.