Government Job Sarkarnama
प्रशासन

Government Job : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर तपशील...

As per the notification, the vacancies of the post of Deputy Director and Park Officer will be filled : अधिसुचनेनुसार उपसंचालक आणि उद्यान अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार

Anand Surwase

Government Job : राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने विविध रिक्त पदासाठी नोकर भरती सुरू केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने जारी केलेल्या भरतीच्या अधिसुचनेनुसार उपसंचालक आणि उद्यान अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची पात्रता निकष काय आहेत? अर्जाच्या सविस्तर प्रक्रियेबाबत जाणून घेऊयात राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या भरतीच्या अधिसूचनेनुसार मंडळाकडून ग्रुप ए आणि बीच्या एकूण 44 रिक्त जांगाची भरती केली जाणार आहे. यामध्ये उपसंचालक पदाच्या 19 आणि वरिष्ठ उद्यान अधिकारी पदाच्या 25 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा असून त्यासाठीच्या अंतिम मुदतीमध्ये मंडळाकडून 5 जानेवारी निश्चत करण्यात आली होती. ती वाढवून 15 जानेवारी 2024 करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये पुन्हा वाढ केली जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घेणे आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जाची प्रक्रिया आणि शुल्क

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मंडळाच्या exams.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. दरम्यान, अर्जामध्ये काही माहिती चुकीची गेल्यास अथवा अपूर्ण असल्यास उमेदवारांना अर्जाच्या मुदतीनंतर 17 जानेवारीपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या भरतीसाठी उमेदवारांनाऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि OBC/EWS तसेच SC/ST उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्कआकारले जाणार आहे.तर या भरतीसाठी दिव्यांग उमेदवरांना शुल्कमाफीची सवलत देण्यात आली आहे.

काय आहे पात्रता ?

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवी, अभियांत्रिकी पदवी, CA,MBA, किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेला असावा. तसेच उमेदवाराचे वय हे उपसंचालक पदासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 40 आणि वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी या पदासाठी 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

तसेच राखीव श्रेणीतील उमेदवारासाठी दोन्ही पदांच्या भरतीसाठी शासकीय नियमानुसार मागासवर्गीयांना वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षाची कमाल मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये आरक्षण, शैक्षणिक अहर्ता, परीक्षा पद्धती या संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मंडळाच्या https://www.nhb.gov.in/vacancy.aspx?menu.Menu=27 या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT