South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ कुणाचा? ठाकरे अन् काँग्रेस आमने-सामने!

South Mumbai Lok Sabha : दोन वेळा ठाकरेंचा खासदार, तर काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ..
South Mumbai Lok Sabha
South Mumbai Lok Sabha Sarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव -

Mumbai News : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीनेही 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय तिन्ही घटकपक्षांनी घेतला आहे. मात्र या एकीमध्ये आता वाद होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी ही लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

South Mumbai Lok Sabha
Raj Thackeray News : 'खरंच लावा बांबू..!' मुजोर टोल कॉन्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा दम...

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी या मेळाव्या दरम्यान दाखवला. मात्र, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दक्षिण मुंबईत आपला प्रभाव जास्त असल्याचा दावा ठाकरेंनी केला, तर यावर काँग्रेसही दावा करेल, असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीतील एक घटकपक्ष दक्षिण मुंबईवर आपला दावा करीत आहे, मात्र मला कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद वाढवायचा नाही. मागील पन्नास वर्षांपासून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आहे. खासदार असो किंवा नसो कामेदेखील केली जात आहेत. भाजप आणि शिवसेना युतीत लढल्यामुळे अरविंद सावंत हे दोनदा तिथे खासदार म्हणून निवडून आले, असं मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलं आहे.

South Mumbai Lok Sabha
Arvind Kejriwal : भाजपचा मला अटक करण्याचा डाव; ईडी चौकशीवर केजरीवालांचे 'इमोशनल कार्ड'

अरविंद सावंत यांचा पलटवार -

सरकारनामाने खासदार अरविंद सावंत यांच्याशी यासंबंधी चौकशी केली, त्यावेळी अरविंद सावंत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिलिंद देवरा हे आता दोन महिन्यांपासून चित्रात दिसत आहे, आता कुठे त्यांचे पोस्टर आणि बॅनर दिसायला लागले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये मिलिंद देवरा हे नावदेखील समोर नव्हतं. कोरोनाकाळातदेखील मिलिंद देवरा यांनी नेमकी काय कामगिरी केली, याचा खुलासा त्यांनी करावा. दक्षिण मुंबईचे दोन मतदारसंघ होते, मोहन रावळे आणि जयंतीबेन मेहता या दोघे निवडून आले आणि त्यानंतर हा मतदारसंघ मोठा झाला आहे. त्यामुळे कोणीही त्यावर दावा करणं चुकीचं आहे. केवळ आम्ही तिथे सभा घेतली, यामुळे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

(Edited by - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com