Kolhapur Police Suspension News Sarkarnama
प्रशासन

Police Officers Transfers: फडणवीसांच्या गृह विभागाकडून मोठी अपडेट; एकाचवेळी 15 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Mahayuti Government : राज्यात महायुती सरकारनं सत्तेत आल्यापासून सातत्यानं आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गृह विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असून जून महिन्यातही राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वत्र राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृह विभागानं पोलिस (Police) विभागात मोठे फेरबदल करताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

राज्य सरकारकडून सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेशाला 24 तास पूर्ण होत नाही,तोच गृह विभागाकडून गुरुवारी(ता.14) पुन्हा एकदा 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बीड, लातूर, अमरावती, या जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आगामी निवडणुकीआधीच पोलिस दलात बदल्यांचा (Transfer) धडाका सुरु झाला आहे. राज्यातील 15 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड, लातूर, अमरावती यांसह विविध जिल्ह्यांतील सहायक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.

पोलीस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर सोलापूर मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मच्छिंद्र पंडित यांची सहायक पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

मुंबईतील नागरी हक्क संरक्षण विभागातील पोलीस उप अधीक्षक मधुलिका महेशकुमार ठाकूर यांची नागपूरमधील नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस उप अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात सात जुलै रोजीच मोठे बदल करण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढतानाच पोलिस उपआयुक्त दर्जाच्या राज्यातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले होते. पुणे,मुंबईसह इतर जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश होता. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी पोलीस दलात मोठे फेरबदल होताना दिसून येत आहे.

तसेच राज्यात महायुती सरकारनं सत्तेत आल्यापासून सातत्यानं आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गृह विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असून जून महिन्यातही राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

यावेळी तब्बल 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.यात 51 IPS अधिकार्‍यांचाही समावेश होता. या आयपीएस अधिकार्‍यांपैकी काहींचं प्रमोशन तर काहींचं डिमोशन करुन बदली करण्यात आली होती. तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT