Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

Devendra Fadnavis : धक्कादायक! फडणवीसांची बनावट सही, मेलच्या वापरातून बदली; गृहविभागाचा मोठा निर्णय

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra News : सरकारी अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड तयार करून अनेकांनी लोकांना ठगल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आता मात्र थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट सही, लेटरहेड, ई-मेल तयार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही त्याद्वारे बदलीचे बनावट आदेशही काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर गृहविभागाने सरकारी अधिकाऱ्यांना खासगी मेल वापरण्यास बंदी घातली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह त्यांचे खासगी सचिवांचे बनावट सही, ईमेल तयार करण्यात आले आहे. त्या ईमेलद्वारे, विद्युत विभागातील सहा अभियंत्यांच्या बदलीचे बनावट आदेश दिले आहेत. त्या बनावट लेटरहेडवर बनावट सहीही आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने याची दखल गृहविभागाने घेतली आहे. त्यानुसार त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने दिलेले अधिकृतच ईमेल वापरणे बंधनकारक केले आहे. या आदेशनुसार आता अधिकाऱ्यांना त्यांचे पर्सनल आणि जीमेल वापरता येणार नाहीत.

काय आहेत सूचना

शासकीय विभागांसह त्यांच्या संबंधित कार्यालयांनी शासकीय कामकाजासाठी NIC द्वारे दिलेल्या अधिकृत केलेल्या gov.in/nic.in या डोमेन नेम असलेल्या ई-मेलचा वापर करावा.

कम्युनिकेशनसाठी ई-ऑफिस आणि तत्सम स्थापित सरकारी प्लॅटफॉर्मचा वापर करावा.

Gmail, Yahoo आदी खासगी कंपन्यांचे ई-मेल कोणत्याही शासकीय कामकाजासाठी वापरु नयेत. त्या मेलद्वारे आलेली माहिती अधिकृत मानली जाणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भविष्यात सरकारच्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी या सूचनांची सर्व शासकीय विभाग आणि त्यांच्या कार्यालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच या मार्गदर्शक सूचना सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व कार्यालयांना देव्यात, असेही आदेश दिले आहेत. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर महाराष्ट्र यांनी वरील मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव शासनास सादर केला. त्यानुसार या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT