Mahasanskruti Mohatsav : प्रचारात कमी पडले की दुर्लक्ष? रिकाम्या खुर्च्यांची अवकळा

Buldhana Administration : नागरिकांबरोबर राजकीय नेत्यांचीही कार्यक्रमाला दांडी
Mahasanskruti Mohatsav at Khamgaon.
Mahasanskruti Mohatsav at Khamgaon.Sarkarnama
Published on
Updated on

Mahasanskruti Mohatsav : पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली येथे आयोजित करण्यात आलेला महासंस्कृती महोत्सव ‘फेल’ ठरला आहे. सोमवारी (ता. 12) रात्री उशिरापर्यंत या महोत्सवातील खुर्च्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रेक्षकांची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली येथेही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासन प्रचार-प्रसारात कमी पडली की लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले कुणास ठाऊक रिकाम्या खुर्च्यांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते व अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही पाठ फिरविली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी खुर्च्यां रिकाम्याच राहिल्या. गर्दी झालीच नाही. अगदी बोटांवर सहजपणे मोजता येईल एवढीच गर्दी या कार्यक्रमात झाली. प्रेक्षकांची संख्याही अत्यंत नगण्य होती. त्यामुळे हा कार्यक्रम सपशेल ‘फेल’ ठरला. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना लोकसंस्कृतीची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही शासनाने उपलब्ध करून दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा दोन दिवसीय महोत्सव होता. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याकडेही राजकीय नेते, अधिकारी व सामान्य नागरिकांची पाठ फिरविली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahasanskruti Mohatsav at Khamgaon.
Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

महासंस्कृती महोत्सवासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून सरकारने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे महासंस्कृती मेळाव्याचा आयोजन केले. मात्र या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील एकाही आजी-माजी लोकप्रतिनिधी महोत्सवांकडे फिरकला नाही. उद्घाटनालाही हजेरी लावली नाही. महोत्सवाचा प्रचार-प्रसार योग्य प्रमाणात न झाल्याने सामान्य नागरिकही महोत्सवाकडे फिरकले नाहीत. साऱ्यांनीच पाठ फिरविल्यामुळे या अत्यंत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन फसले. सरकारने उत्सवासाठी एक रुपयाही कमी पडू दिला नाही. उलट बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच यात कमी पडल्याचे यावरून सिद्ध होते. मोजकीच उपस्थिती असल्याने जिल्हाधिकारी व मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपण्यात आला.

महासंस्कृती महोत्सवात पाच हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यातील 99 टक्के खुर्च्या रिकाम्या राहिल्या. रिकाम्या खुर्च्यांसमोर सर्वांना कार्यक्रम सादर करावा लागला. रिकाम्या खुर्च्यांसमोरच पाहुण्यांनी भाषणबाजी केली. याच रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कोण कमी पडले, याचे चिंतन करण्याची गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेता महाले हे दिग्गज स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. परंतु यापैकी एकानेही सरकारच्या महासंस्कृती महोत्सव गांभीर्याने घेतला नाही. यापैकी बरेच आमदार सत्ताधारी पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला असता तर सरकारी आयोजन ‘फेल’ ठरले नसते, असे सांगण्यात येत आहे.

Mahasanskruti Mohatsav at Khamgaon.
Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाही महासंस्कृती महोत्सवासाठी व्यापक प्रचार-प्रसार करता आला असता. परंतु तसे झाले नाही. नरवाडे यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. पोलिस अधीक्षक सुनील कडासनेही बुलढाण्याचा बोथा जंगल घाट उतरून 50 किलोमीटरवर असलेल्या खामगावात येऊ शकले नाहीत.

Edited By : Prasannaa Jakate

Mahasanskruti Mohatsav at Khamgaon.
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com