Ujjwal Nikam And Pooja Khedkar.jpg Sarkarnama
प्रशासन

Ujjwal Nikam On Pooja Khedkar Case : उज्ज्वल निकम यांची पूजा खेडकर प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; UPSC कडे केली 'ही' मोठी डिमांड

Ujjwal Nikam First Reaction On IAS Pooja Khedkar : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे.

Deepak Kulkarni

Ujjwal Nikam on Pooja Khedkar: एक ना अनेक 'पराक्रमां'मुळे वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात 'यूपीएससी'ने आक्रमक पावलं उचलली आहे. पूजा खेडकर यांना मोठा झटका देतानाच त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचा मोठा निर्णय यूपीएएसीने घेतला आहे.

त्यानंतर आता पूजा खेडकरविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी वाशिम सोडलं आहे. आता याच पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याविरोधात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोठी मागणी केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांना तुमची निवड रद्द का करू नये असा सवालही नोटिसमध्ये केला आहे.त्यामुळे आता खेडकर यांचे आयएएस केडर पद दाट जाण्याची शक्यता आहे.केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ही माहिती प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.

उज्ज्वल निकम काय काय म्हणाले?

उज्ज्वल निकम म्हणाले, सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे लोकांच्या मनात शंका उपस्थित झालेली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय पातळीवर चौकशी सुरू असली तरी यूपीएससीने (UPSC) ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्याविषयी लोकांच्या मनात एक शंका उपस्थित झाली आहे. सरकारला निश्चितपणे याचं निराकरण करावं लागणार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

निकम यांनी पूजा खेडकर यांचं हे प्रकरण गंभीर असून ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत.त्यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यूपीएससीने याबाबतीत पारदर्शकपणे तातडीने चौकशी करून कायदेशीर निकाल देणे अपेक्षित आहे,असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांविरोधात भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र,या बहुप्रतिष्ठित लढतीत उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी निकम यांना पराभवाची धूळ चारली.

त्यानंतर आता शिंदे सरकारने त्यांची पुन्हा एकदा सरकारी वकील पदावर नियुक्ती केली आहे. त्याच निकमांनी आता पूजा खेडकर प्रकरणात उडी घेत केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

विशेषतः दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र घेतलं असेल आणि अशा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ही परीक्षा पास होऊन त्याप्रमाणे काही सवलती प्राप्त करून काही नियुक्त्या केल्या असतील तर त्याची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निकम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT