Income Tax Raid  Sarkarnama
प्रशासन

Income Tax Raids: अबब ! खासदाराच्या घरात सापडली 'एवढी' मोठी कॅश; नोटा मोजता मोजता मशीनही थकल्या...

Congress MP Dhiraj Sahu : या कारवाईनंतर झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू चर्चेत आले आहेत.

Ganesh Thombare

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात इन्कम टॅक्स, ईडी आणि 'सीबीआय'च्या कारवाईचा धडाका सुरू आहे. आता झारखंडमध्ये इन्कम टॅक्स विभागाने मोठी कारवाई केली असून, तब्बल 200 कोटींची कॅश जप्त केली आहे. या कारवाईनंतर झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू चर्चेत आले आहेत.

इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी तीन राज्यांतील जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये झारखंड आणि ओडिशामधील एका मद्य उत्पादन कंपनीवर छापा टाकला. या वेळी येथे तब्बल 200 कोटींची कॅश इन्कम टॅक्स विभागाला मिळाली. 200 कोटींची कॅश मोजण्यासाठी मशीन आणण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर या नोटा मोजताना काही मशीनही बंद पडल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इन्कम टॅक्स विभागाने ज्या कंपनीवर छापा टाकला ती कंपनी काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच झारखंड आणि ओडिशामधील अजून काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम ही बेहिशोबी असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील पुढील कारवाई इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या 200 कोटींची कॅश आढळून आल्यामुळे झारखंड आणि ओडिशात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी एक ट्विट केलं आहे. एका पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीचा फोटो पंतप्रधान मोदी यांनी शेअर करत म्हटलं की, "देशवासीयांनो या नोटांचा ढीग पाहा आणि या लोकांच्या इमानदारीची भाषणं ऐका. जनतेकडून जे लुटलं आहे, त्यातील एक-एक रुपया परत द्यावा लागेल, ही मोदींची गॅरंटी आहे", असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT