Pimpri IT Raid : पिंपरीत 'ईडी'नंतर आता 'इन्कम टॅक्स'ची रेड; बिल्डरांच्या कार्यालय, घरांवर छापे !

Pimpri Chinchwad : पोलिस, ईडी आणि इनकम टॅक्सच्या रडारवर पिंपरी
IT Raid In Pimpri
IT Raid In PimpriSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान उद्योगनगरीची बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात पोलिसांनी एका मोठ्या बेटिंग अड्यावर रेड केली. त्याअगोदर तेथेच सिंधी व्यापाऱ्यांच्या सेवाविकास बँकेतील सव्वाचारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी या माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्या बंगल्यावर `ईडी`ने छापा टाकला होता. तर, आता इनकम टॅक्स विभागाने शहरातील तीन बिल्डरांच्या कार्यालये आणि घरांवर छापे टाकले आहेत.

शहरातील सिंधी बाजारपेठेतील बिल्डर श्रीचंद आसवानी यांच्या निवासस्थानी गुरुवारी छापेमारी केली. आसवानींच्या घरी सकाळी सहा वाजताच पाच मोटारीतून इनकम टॅक्स अधिकारी धडकले. त्याबरोबर आसवानी बिल्डर्सच्य़ा कार्यालयावरही त्यांनी छापेमारी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IT Raid In Pimpri
Raju Shetti : स्वाभिमानी चळवळीची शिस्त बिघडली; आनंदोत्सवातच राजू शेट्टी पडले, नेमकं काय झालं ?

आसवानींसह शहरातील आणखी दोन बिल्डरांची घरे आणि ऑफिसवर ही कारवाई झाली. टुरिस्ट मोटारीतून येऊन या धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे तिचा लगेच बभ्रा झाला नाही. त्यामुळे आसवानींच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावरील वर्दळही नेहमीसारखी सुरु होती. नंतर त्यांच्याकडे आलेल्यांना गेटवर रोखण्यात आल्याने ही धाड पडल्याचे समजले. सायंकाळपर्यंत ही झाडाझडती सुरु होती. (Latest Political News)

यापूर्वीही आसवानी यांच्या कार्यालयावर काही वर्षापूर्वी इनकम टॅक्सची रेड झाली होती. पण, त्यावेळी त्यात काही विशेष आढळले नव्हते. ते आणि मुलचंदानी फॅमिली विविध राजकीय पक्षांशी सबंधित आहे. दोन्ही घराणी एकमेकांची कट्टर शत्रू आहेत. ते विविध तपास यंत्रणात एकमेकांविरुद्ध तक्रारी देतात.

मुलचंदानींच्या कार्यालयात एका आमदाराची ऊठबस होती. र,आसवानी हे दुसऱ्या एका आमदाराचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. आता त्यांच्यात वितुष्ट आले आहे. दरम्यान, पिंपरी पोलिस, ईडी आणि इनकम टॅक्सच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

IT Raid In Pimpri
Devendra Fadnavis : फडणवीस दर्शनाला, पाटील-भरणे स्वागताला; श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद कुणाला ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com