ACB officials detain Jalna Municipal Commissioner Santosh Khandekar after being caught accepting a ₹10 lakh bribe from a contractor exposing rampant corruption in Maharashtra’s civic administration. Sarkarnama
प्रशासन

Santosh Khandekar : जालना महापालिका आयुक्तांना अटक; 10 लाखांची लाच घेताना ACB रंगेहाथ उचललं

Jalna Municipal Commissioner Arrested : जवळपास 6 वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ, अमरावती येथे पोलीस खात्यात सेवा बजावल्यानंतर आणि 'एमपीएससी'ची परीक्षा पास होऊन क्लास 2 अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेला आणखी एका अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Jalna News, 17 Oct : मागील काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी MPSC, UPSC सारख्या कठीण परीक्षा देऊन पास झालेले हे अधिकारी खऱ्या आयुष्यात मात्र नापास झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच आता जवळपास 6 वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ, अमरावती येथे पोलीस खात्यात सेवा बजावल्यानंतर आणि 'एमपीएससी'ची परीक्षा पास होऊन क्लास 2 अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेला आणखी एका अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हा भ्रष्ट अधिकारी जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर असून त्याला 10 लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. महापालिकेच्या विविध कामांची बिले मंजूर करण्यासाठी कंत्राटदारांना खांडेकरने तब्बल दहा लाखांची लाच मागितली होती.

याच लाचेची रक्कम घेत असताना एसीबीने त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील डीपी रोड, सिमेंट काँक्रिटकरण आणि महापालिकेच्या तिसऱ्या मजल्याच्या कामाची वर्क ऑर्डर आणि बिलांच्या मंजुरीसाठी आयुक्त संतोष खांडेकरने तक्रारदाकडे 20 लाखांची लाच मागितली होती.

त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती एसीबीला दिली. त्यानंतर एसीबीने आयुक्त खांडेकरच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचत त्याला 10 लाखांची रोकड स्विकारताना रंगेहाथ पकडलं.

दरम्यान एसीबीने कारवाई केल्यानंतर काही कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेरफटाके फोडून या कारवाईचं स्वागत केलं. मात्र, आयुक्तांसारख्या प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचं प्रकरण उघडकीस आल्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचार बोकाळल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT