Bamboo Research And Training Centre Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Forest Department: बांबू संशोधन-प्रशिक्षण केंद्रात नोकरी हवीय? ; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

Mangesh Mahale

जागतिक स्तरावर शेती, बांधकाम, पॅकिंग अशा विविध क्षेत्रांत बांबूचा वापर वेगाने वाढत आहे. शाश्‍वत शेती विकास, पर्यावरण संरक्षण, जागतिक तापमानवाढ, स्वच्छ वातावरणाचा विचार करताना बांबू हा त्यात महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यावरूनच बांबूची उपयोगिता विविध क्षेत्रांत सिद्ध झाली आहे.

Maharashtra Forest Department

महाराष्ट्र वनविभागाकडून यासाठी प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्याच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फेत कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 20 जागा भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र वनविभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संस्था : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर

शैक्षणिक पात्रता : किमान दहावीपर्यंतचे शिक्षण आवश्यक

वय : 18 ते 40 वर्षे असावे.

एकूण जागा : 20

प्रशिक्षणाचे ठिकाण : चिचपल्ली, चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठी: brtc.org.in या लिंकवर क्लिक करा

( Edited by: Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT