Manoj Jarange: नार्को टेस्ट करा, भुजबळांना येरवडा मेंटल रुग्णालयात पाठवा! जरांगे संतप्त

Maratha Reservation: दारू पिऊन जरांगे-पाटील यांच्या किडण्या किडल्या, अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे.
Chagan Bhujbal & Manoj jarange Patil.
Chagan Bhujbal & Manoj jarange Patil.Google
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. ओबीसींमधून मराठा आरक्षण देण्यास छगन भुजबळांचा विरोध असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. त्यावरून जरांगे-पाटील यांनी भुजबळावर पुन्हा कठोर टीका केली आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत वाढवून मिळावी, यासाठी गिरीश महाजन यांच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. "गिरीश महाजनांनी भुजबळांना येरवडा मेंटल रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत. महाजनांनी भुजबळांना बांधून सलाईन टोचावी," अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांवर टीकास्त्र डागले आहे.

Chagan Bhujbal & Manoj jarange Patil.
Uddhav Thackeray: मोर्चात BJP नव्हती मग सेटलमेंट कशी होणार? उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सुनावलं

ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी जरांगे-पाटलांवर दारू पिऊन किडण्या किडल्या अशी जहरी टीका केली होती. भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेनी प्रत्युत्तर दिले आहे.'त्यांना (भुजबळ) माझं चॅलेंज आहे. मी जन्मल्यापासून आतापर्यंत थेंबभर जरी दारू पिलो असेल तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी (भुजबळ) तरी समाधी घ्यावी. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे" असे जरांगे म्हणाले. कोणी कितीही विरोध केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेलच, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.

"विरोध करणाऱ्यालाच माणूस बोलतो, म्हणून भुजबळ विरोध करीत आहेत. आमच्याकडेही त्यांची माहिती आहे. मी जर काही सांगितलं तर ते सगळे सोडून हिमालयात जाईल. भुजबळांच्या दोन-तीन वाईट घटना मला पुराव्यासकट माहिती आहेत," असा दावा जरांगेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com