Job Opportunity Sarkarnama
प्रशासन

Job Opportunity : आयटीआय उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; तब्बल अकराशे जागांची बंपर भरती

Job Opportunity in Electronics Corporation of India : नोकरीच्या शोधात असणाऱ्या आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Anand Surwase

Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या अखत्यारितील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्रता आणि निकष काय आहेत, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या...

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयटीआय ट्रे़डच्या शैक्षणिक अर्हतेवर तब्बल 1100 ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रे़डच्या 275, इलेक्ट्रिशियन 275 आणि फिटरची 550 पदे भरली जाणार आहेत. ही भरती कंत्राटी उमेदवार म्हणून केली जाणार आहे. यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भरतीची जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराने आयटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटरचा कोर्स पूर्ण केलेला असावा. तसेच या कामाचा उमेदवारास किमान 01 वर्ष अनुभव आवश्यक आहे. यासाठी उमेदवारास आय़टीआयमध्ये किमान 60% गुण अपेक्षित आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 16 जानेवारी 2024 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. यामध्ये SC/ST च्या उमेदवारांना 05 वर्षे, तर OBC कॅटॅगिरीतील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी उमेदवाराने ECIL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक पात्रतेची माहिती अचूक आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 16 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव विचारात घेऊन उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवाराचे दहावीचे मार्कशीट, आयटीआयचे प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा पुढील लिंकवर सविस्तर जाहिरात पाहावी. https://drive.google.com/file/d/1VfJAtglRHCrN-R0UM0IV_WhRAQUTckHX/view

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT