Income Tax Department : आयकर विभागात मोठी भरती ! तब्बल 'एवढ्या' जागा भरणार !

Job Opportunity in Income Tax Department : मुंबई आयकर विभागाने विविध पदांची भरती जाहीर केली.
Income Tax Department
Income Tax DepartmentSarkarnama
Published on
Updated on

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आयकर विभागाच्यावतीने क्रीडापटूंसाठी विविध पदांसाठी विशेष भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुंबई आयकर विभागाने विविध पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

आयकर विभागाच्यावतीने क्रीडापटूसाठी तब्बल 291 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत दहावी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी उमेदवार हा क्रीडापटू असणे आवश्यक आहे.

यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना 19 जानेवारी 2024 पर्यंत आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. यासाठी उमेदवारांनी आयकर विभागाच्या incometaxmumbai.gov.in यासंकेतस्थळावर भेट द्यावी.

Income Tax Department
Government Job : गुप्तचर विभागात 226 जागांसाठी नोकरभरती; आताच अर्ज करा

पात्रता आणि निकष

आयकर विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कमटॅक्स (ITI) 14 पदे, स्टेनोग्राफर 18 पदे, टॅक्स असिस्टंट (TA) 119 पदे, मल्टिटास्किंग स्टाफ (MTS) 137 पदे आणि कॅन्टीन अटेंडंटची 03 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही विविध पदानुरुप दहावी, बारावी, पदवीधर उतीर्ण आणि क्रीडापटू म्हणून पात्र असावा.

यासाठी उमेदवाराकडे राज्य किंवा देशस्तरावर क्रीडापटू म्हणून प्रतिनिधित्व केलेले असावे, किंवा विद्यापीठ, महाविद्यालयस्तरावर खेळात विशेष प्रावीण्य मिळवेले असावे किंवा उमेदवार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असावा. क्रीडापटूंच्या निकषासंबंधी सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरात पाहावी.

अर्जाची प्रक्रिया...

या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे वय दिनांक 1 जानेवारी 2023 पर्यंत 18 ते 30 वर्षादरम्यान असावे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

तसेच या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने आवश्यक माहिती आणि प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांकडून 200 रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे. उमेदवारांनी ते अर्जासोबत ऑनलाइन भरणा करावा.

या भरतीसाठी पात्रता तपासण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा पुढील लिंकच्या माध्यमातून सविस्तर जाहिरात पाहावी. https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf. या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Income Tax Department
Job Opportunity in Railways : आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 1646 पदांची मेगा भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com