PNB Sarkarnama
प्रशासन

Job Opportunity in PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 जागांसाठी भरती, जाणून घ्या डिटेल्स...

Anand Surwase

Bank Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून विविध पदांच्या तब्बल 1 हजार 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी बँकेकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात..

पंजाब नॅशनल बँक या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकेकडून विविध शाखेतील रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत क्रेडिट ऑफिसरची 1000 पदे, फॉरेक्स मॅनेजरची 15, सायबर सिक्युरिटी मॅनेजर 05, सायबर सिक्युरिटी सीनियर मॅनेजर- 05 अशा एकूण 1025 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Job Opportunity in Punjab National Bank)

या विविध पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रताही क्रेडिट ऑफिसर पदासाठी CA/CMA किंवा CFA किंवा MBA पदवी प्राप्त असावी. तसेच फॉरेक्स मॅनेजर पदासाठी उमेदवार हा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमाधारक असावा. तसेच उमेदवारास कामाचा किमान 02 वर्षे अनुभव आवश्यक आहे. सायबर सिक्योरिटी मॅनेजर पदासाठी 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा MCA पदवी प्राप्त उमेदवार असावा, तसेच या क्षेत्रातील किमान 02 वर्षे कामाचा अनुभव असावा सिनिअर पदासाठी 04 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजीपर्यंत क्रेडिट ऑफिसर पदासाठी 21 ते 28, फॉरेक्स मॅनेजरपदासाठी 25 ते 35 आणि तर सीनिअऱ सायबर सिक्युरिटी मॅनेजरपदासाठी 27 ते 38 वर्ष असावे. सरकारी नियमानुसार SC/ST उमेदवारास कमाल 5 वर्षे सूट, तर OBC साठी 3 वर्षे वयाची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून भरती शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये खुला प्रवर्गासाठी ₹1,180 आणि मागासवर्गीयांसाठी 59 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क उमेदवारांने ऑनलाईन भरायचे आहेत.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात पाहावी.

https://drive.google.com/file/d/187T6hqdakkR3A0CpynSmOq7gkJNCsXoc/view

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT