Job Opportunity in RTR : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी; भारतीय रेल्वेत नऊ हजार पदांची भरती !

Job Opportunity in Indian Railway : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, लवकरच नऊ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
Indian Railway Job
Indian Railway JobSarkarnama
Published on
Updated on

Railway Technician Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने टेक्निशियन पदाची मेगा भरती करण्यात येणार आहे. या संबंधी रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सुमारे 9000 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. (Railway Technician Recruitment)

आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची ही मोठी संधी असणार आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने विविध विभागातील टेक्निशियनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भरतीची सविस्तर जाहिरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येईल. या मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आणि त्यानंतर संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Indian Railway Job
Job Opportunity in Department of Public Health : सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मेगा भरती; 1729 पदे भरली जाणार

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून मार्च ते एप्रिल महिन्यात ऑनलाईन अॅप्लिकेशन भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे रेल्वे भरती बोर्डाचे नियोजन असल्याचे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच या भरतीची अंतिम निवड यादी एप्रिल 2025 पर्यंत प्रसिद्ध करण्याचे नियोजित असल्याचेही रेल्वे भरती बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. या भरतीच्या अधिसूचनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढील जाहिरात लिंक पाहावी- https://rrbald.gov.in/Technicians%20Tentative%20Timeline%20Notice%20dt%2031012024.pdf

(Edited By-Ganesh Thombare)

Indian Railway Job
Job Opportunity in CIDCO : 'सिडको' महामंडळात होणार 101 सहाय्यक अभियंता पदांची भरती; त्वरित करा अर्ज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com