Gadchiroli-Chimur Lok Sabha Constituency Sarkarnama
प्रशासन

Lok Sabha Election 2024: नक्षलवाद्यांच्या 'बुलेट' रोखणार; वायुदलाचे आठ हेलिकॉप्टर 'अलर्ट'

Gadchiroli–Chimur Lok Sabha Election: निवडणुकीच्या काळात गडचिरोली पोलिसांचे 1 हजार सी-60 जवान 24 तास जंगलात नक्षल अभियानावर राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण 950 मतदान केंद्र असून, त्यापैकी 361 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli–Chimur Lok Sabha constituency: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाची (Election Commission) पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. हा मतदारसंघ अतिसंवेदनशील असल्याने आयोगाने योग्य ती खबरदारी घेतल्याचं दिसत आहे. (Gadchiroli-Chimur Lok Sabha Election)

या निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सज्ज झालं असून, तब्बल 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे. यामध्ये सीआरपीएफच्या (CRPF) 40 कंपनी आणि एसआरपीएफच्या 17 कंपन्या तसेच 1 हजार 700 होमगार्ड तैनात राहणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या निवडणुकीच्या काळात गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांचे 1 हजार सी-60 जवान 24 तास जंगलात नक्षल अभियानावर राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण 950 मतदान केंद्र असून, त्यापैकी 361 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर हेलिकॉप्टरने मतदान कर्मचाऱ्यांना पोहोचवले जात आहे. यासाठी हवाई दलाचे 5 तर लष्करचे 2 आणि जिल्हा पोलिसांचा एक असे 8 हेलिकॉप्टर निवडणूक कामासाठी वापरण्यात येणार आहेत.

हेलिकॉप्टरसह 130 ड्रोनद्वारे नक्षली घडामोडींवर नजर राहणार असून, 750 किलोमीटरची रोड ओपनिंग केल्यानंतर या पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहेत, अशा तगड्या बंदोबस्तामध्ये गडचिरोलीमधील निवडणूक पार पडणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT