Lok Sabha Election: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदिवासी भागातील महिला नेत्याला मोठी संधी

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray: या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला संभाजीनगर आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी फायदा होऊ शकतो. विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागातील आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही नियुक्ती उपयोगी पडू शकते.
Former MLA Nirmala Gavit
Former MLA Nirmala GavitSarkarnama
Published on
Updated on

Former MLA Nirmala Gavit: माजी आमदार निर्मला गावित यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीने नाशिकसह आदिवासी राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न झाला आहे. या नियुक्तीचा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) पक्षाला फायदा होऊ शकतो. निर्मला गावित या इगतपुरीच्या माजी आमदार आणि नंदुरबारचे दिवंगत खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत.

ठाकरे गटाने काल हा निर्णय घेतला. तसेच सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची देखील पदोन्नती करण्यात आली आहे. ते आता शिवसेनेचे नेते असतील. अवधेश शुक्ल यांची शिवसेनेचे संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना या नियुक्त्या केल्यामुळे त्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व देण्यात येत आहे.

यानिमित्तामुळे शिवसेना ठाकरे गटाला संभाजीनगर आणि नाशिक (Sambhajinagar and Nashik) या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी फायदा होऊ शकतो. विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागातील आदिवासी मतदारांना (Adivasi Voter) आकर्षित करण्यासाठी गावित यांची नियुक्ती उपयोगी पडू शकते. गावित या मतदारसंघातील माजी आमदार आहेत. त्यांनी आदिवासींच्या जमीनींना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी आदिवासी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. त्यामुळे या समाजाची त्यांच्याशी जवळीक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली आहे. या नाराजीतून शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर यांनी पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. ते सध्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde) संपर्कात आहेत. शिंदे गटाची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदिवासी भागातील नेत्यांना मोठी संधी दिलेल्या शिवसेना ठाकरे गटाला विरोधकांकडून धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला निर्मला गावित यांच्या नियुक्तीतून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Former MLA Nirmala Gavit
Lok Sabha Election: भाजपमधून आयात केलेल्या व्यक्तीला उमेदवारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य

नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा भगवाच फडकेल

या नियुक्तीनंतर माजी आमदार गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी एका आदिवासी महिलेला काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. हा आदिवासी समाजावर व्यक्त केलेला विश्वास आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी मी परिश्रम घेईल. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला इगतपुरी विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळावे हा आम्हा सर्वांचा प्रयत्न असेल. नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा भगवाच फडकेल, यात कोणतीही शंका नाही. असा निर्धार गावित यांनी व्यक्त केला.

शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर हे नाशिकच्या ग्रामीण भागात संपर्क असलेले नेते आहेत. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्याला निर्मला गावित यांच्या नियुक्तीतून शिवसेनेने जोरदार उत्तर दिले आहे. या नियुक्तीमुळे महाविकास आघाडीला (MVA) राजकीय फायदा मिळू शकतो असं बोललं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

Former MLA Nirmala Gavit
Dhule Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करणे निवडणूक जिंकण्याएवढेच दिव्य!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com