Election Commission sarkarnama
प्रशासन

Election Commission News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी!

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केले जाऊ शकते.

Mayur Ratnaparkhe

Election Commission and Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध आता राजकीय पक्षांबरोबरच सर्वासामान्यांनाही लागले आहेत. जागावाटपांवरून राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत, तर इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेच्या काळात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय नेत्यांना प्रशासकीय विभागांच्या वेबसाइटवरून आपले फोटो काढावे लागणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय या निवडणुकीत प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी मतं मागू नयेत. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी विधाने करून नयेत, धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी उपयोग करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. शिवाय , आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे.

निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यानंतर तत्काळ आचारसंहिताही लागू होईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना वारंवार जारी केल्या जात आहेत. या अगोदर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उमेदवारांसाठी प्रचारादरम्यान कोणती दक्षता बाळगावी याबाबत सूचना केल्या होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT