Lok Sabha Election 2024 : मायावतींचा दक्षिणेत शिरकाव; ‘केसीआर’ देणार साथ

BSP-BRS Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. केसीआर यांना उत्तर भारतातही त्याचा फायदा होणार आहे.
K Chandrachekar Rao, Mayawati
K Chandrachekar Rao, MayawatiSarkarnama
Published on
Updated on

Telangana News : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण इतर राज्यांमध्ये त्यांच्याकडून प्रादेशिक छोट्या पक्षांना हाताशी धरून निवडणुकीत उतरण्यासाठी धडपड सुरू केली आहे. आता मायावतींनी दक्षिणेत शिरकाव केला असून भारत राष्ट्र समितीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी दोन्ही पक्षांतील आघाडीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष विविध मुद्यांवर एकत्रितपणे लढतील. जागावाटपावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केसीआर यांनी मंगळवारी दिली.

K Chandrachekar Rao, Mayawati
Sandeshkhali Case : ममता सरकारने हायकोर्टाचा आदेश धुडकावला; CBI चे अधिकारी रिकाम्या हाताने परतले

केसीआर आणि बीएसपीचे (BSP) तेलंगणा प्रमुख आर. एस. प्रविण कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा आहेत. मागील निवडणुकीत बीआरएसला (BRS) नऊ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता राज्यातील सत्ता गेल्यानंतर काही विद्यमान खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुकीत बीआरएसला केवळ तीन ते चार जागा मिळतील, असा अंदाज विविध सर्व्हेंतून व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर केसीआर यांनी बीएसपीला सोबत घेतले आहे. मात्र, राज्यात मायावतींच्या (Mayawati) पक्षाचा तितकासा प्रभाव नाही. त्यामुळे या आघाडीचा केसीआर यांना कितपत फायदा मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केसीआर यांनी सोमवारी चार उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तीन विद्यमान खासदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तातडीने ही यादी प्रसिध्द केली. दोन खासदार भाजपमध्ये तर एका खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही पदाधिकारीही पक्ष सोडून जात असल्याने केसीआर यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते तेलंगणासह देशात इतर ठिकाणीही पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील आहेत.  

K Chandrachekar Rao, Mayawati
Cabinet Expansion News : लोकसभेच्या तोंडावर योगींची खेळी; मंत्रिमंडळाचा विस्तार करत मित्रपक्षांना गोंजारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com