Maharashtra Anganwadi recruitment 2025 
प्रशासन

Anganwadi Recruitment: महिलांना नोकरीची संधी; तब्बल 18 हजार 882 पदांची भरती

Maharashtra Anganwadi recruitment 2025:एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातील विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.

महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या सुमारे १८ हजार ८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, "राज्य सरकार 75 हजार पदभरती करणार आहे, यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत आहे. अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीआदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

अशी आहे निवड प्रक्रिया

  • उमेदवारांना किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • विधवा, अनाथ, एससी-एसटी, ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षाचा अध्यापन अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहे.

  • उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आरक्षणाच्या आधारे केली जाईल. काही उमेदवारांची मुलाखत घेतली जाऊ शकते.

  • 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा आणि निवडीद्वारे 374 पदभरतीची परिक्षा होणार आहे.

100 टक्के पदे भरणार

  1. मुख्यसेविका यांची सरळसेवेने 102 म्हणजे 80 टक्के पदे, तर निवडीद्वारे 272 म्हणजेच 100 टक्के पदे भरावयाची आहेत.

  2. राज्यातील एकूण 553 बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत 1 लाख 10 हजार 591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत.

  3. 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

  4. या भरतीसाठी लवकरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील यात देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT