बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला राजकीय वारसदार कोण असेल याबाबत मोठी घोषणा केली आहे. बसपामध्ये नातेवाईक नव्हे तर बहुजन हित महत्वाचं आहे, असे मायावती यांनी सांगितलं. कांशीराम यांच्या विचाराप्रमाणे जो वागेल तोच बसपाचा उत्तराधिकारी असेल, असे त्या म्हणाल्या.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मायावतींनी सांगितले की आपण कांशीराम यांच्या विचाराने पक्ष चालवित आहे. कांशीराम यांनी दाखवलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करणार असल्याचे त्यांनी 'x'वर म्हटलं आहे. मी जीवंत असे पर्यंत बीएसपीचा कुणीही उत्तराधिकारी राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपला भाचा, पक्षाचे राष्ट्रीय समन्वय आकाश आनंद यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे. गेल्या वर्षी मायावती यांनी आकाश आनंद यांची आपला राजकीय वारसदार असल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी आकाश आनंद यांची आपला वारसदार म्हणून घोषणा केली होती. पण काही महिन्यानंतर त्यांची नेमणूक रद्द केली होती.
अपरिपक्व म्हणून आकाश आनंद यांना मायावतींनी 47 दिवसानंतर पदावरुन हटवलं होते. काही दिवसानंतर मायावती यांनी पुन्हा आकाश आनंद यांची या पदासाठी नियुक्ती केली होती. कांशीराम यांच्या विचारांवर वाटचाल करणारा, पक्षाला पुढे येणारा माझ्यासारखा नेता बसपाचा उत्तराधिकारी होऊ शकतो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांच्या सासरे डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्यासह आणखी दोन जणांची पक्षाकडून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याप्रकरणी या नेत्यांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईनंतर आकाश आनंद यांना अप्रत्यक्षपणे आपणच पक्षश्रेष्ठी आहोत, असा मेसेज मायावतींनी दिला आहे. मी सांगेन तेच पक्षसंघटनेमध्ये करा, असे मायवतींनी आकाश आनंद यांना अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. मायावतींच्या या निर्णयामुळे आकाश आनंद यांची हकालपट्टी होऊ शकते, हे नाकारता येत नाही.
मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी आकाश यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या वादगस्त भाषणामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मायावतींनी आकाश यांना अपरिपक्व सांगत त्यांना पदावरुन हटवलं होते.
त्यानंतर 23 जून रोजी आकाश यांची पक्षाच्या एका राष्ट्रीय बैठकीत पुन्हा वारसदार म्हणून घोषित केले होते. माझा खरा उत्तराधिकारी कोण होणार अशी पोस्ट करत मायावती यांनी बसपमध्ये स्वार्थ, नाती महत्त्वहीन असून बहुजनाचे हित सर्व श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सोशल मीडियातून नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.