Maharashtra Chief Secretary Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Chief Secretary : राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळणार? तीन नावांची शिफारस...

Maharashtra Administration News : नितीन करीर 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्याकडे मुख्य सचिव पदाचा केवळ तीन महिन्यांचा कालावधी होता.

Chetan Zadpe

Mumbai News : राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्य सचिव कोण याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्य सरकारने तीन नावे निवडणूक आयोगाला पाठवली आहेत. यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बालसिंग चहल यांचा समावेश आहे. (Maharashtra Government Chief Secretary)

पहिल्या मुख्य महिला सचिव?

मुख्य सचिव पदावरती वर्णी लावण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तपदी राहिलेले इक्बालसिंग यांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग केल्याची सूत्रांची माहिती आहे, तर दुसरीकडे सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव ठरतील. यामुळे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही वर्षांपूर्वी मेधा गाडगीळ यांना डावलून सेवा ज्येष्ठतेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील बी. के. जैन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नीला सत्यनारायणन, चंद्रा अय्यंगार या महिला अधिकाऱ्यांना (Officers) सुद्धा या मुख्य सचिवपदावर बसण्याची संधी हुकली होती. त्यामुळे या वर्षी तरी राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळून इतिहास घडेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नितीन करीर यांना मुदतवाढ नाही -

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे विद्यमान राज्य मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यताही मावळली आहे. करीर यांची 1 जानेवरी 2024 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नितीन करीर 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्याकडे मुख्य सचिव पदाचा केवळ तीन महिन्यांचा कालावधी होता. त्यांच्या निवृत्तीनंतर या महत्त्वपूर्ण पदासाठी सुजाता सौनिक यांच्यासह तीन नावांची चर्चा आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT