Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : एकेकाळी बारापैकी सात आमदार आणि दोन खासदार देणारा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

NCP Political News : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर हा पक्ष कायम सत्तेच्या शिखरावर राहिला. आता त्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दुर्दशा झाली आहे. येथील पक्षाच्या नेत्यांनी मी आणि माझे कुटुंब, पै-पाहुणे एवढ्यापुरताच ठेवला. जवळील कार्यकर्त्यांशिवाय पक्षासाठी राबणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच मी आणि माझा मतदारसंघ एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेल्या नेत्यांमुळे जिल्ह्यात पक्षाची वाढ खुंटली. परिणामी कोल्हापुरात आज 25 वर्षांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती म्हणजे ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी झाल्याचे दिसून येत आहे.

एकेकाळी बारापैकी सात आमदार आणि दोन खासदार देणारा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा (NCP) पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता; पण त्या तुलनेत नवी पिढी घडवण्याकडे नेतृत्वानेच दुर्लक्ष केले. विधानसभा सोडून कोणतीही निवडणूक असो त्यात आपला घरचा, जवळचा याशिवाय विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पक्ष संघटन वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी पक्षात पडलेल्या फुटीमुळे तर अवस्था आणखी दयनीय झाली आहे. आता दोन्ही गटांना आपापला पक्ष वाढण्यासाठी, टिकवण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. त्यांच्यासमोर नवीन चिन्ह घराघरामध्ये पोहोचविण्याचे आव्हान आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ajit Pawar Vs Vijay Shivtare : विजय शिवतारे - अजित पवारांचं वैर मिटलं; रात्रीच्या भेटीत काय ठरलं?

एकीकडे पक्षाच्या सर्व कामांसाठी तिसऱ्या, चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार, तर सहज निवडून येईल, अशा ठिकाणी मात्र ‘जवळचा माणूस’ ही मानसिकता, यामुळे पक्षाची वाढ मर्यादेपुढे गेलीच नाही. परिणामी अनेकांनी पक्षाला राम राम करत दुसऱ्या पक्षांची कास धरली. त्यात माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, नरसिंगराव पाटील आदींचा समावेश आहे. परिणामी आज जिल्ह्यात पक्षाचा एकही खासदार नाही, तर आमदारांची संख्या अवघ्या दोनवर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Ajit Pawar
Uddhav Thackeray : सरकारनं परवानगी दिली, अन् कोंडी केली; उद्धव ठाकरेंबाबत नेमकं काय घडलं?

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर पक्षाची सर्व भिस्त राहिली आहे. त्यांच्यानंतरची नेतृत्वाची दुसरी फळी कशी तयार होईल, हे वरिष्ठ नेत्यांनी कधी पाहिले नाही. त्याचा फटका ‘राष्ट्रवादी’ फुटल्यानंतर शरदचंद्र पवार गटाला बसला. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक पक्षातून बाहेर पडल्यानंतर पक्ष मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यामुळे पक्षातील असंतुष्ट आणि ज्यांना स्थान मिळत नव्हते, असे कार्यकर्ते बाजूला गेले, एकाकी पडले.

मुश्रीफ यांच्याशी जे जुळवून घेतात, त्यांना संधी मिळाली. आता मुश्रीफ हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात गेल्याने शरदचंद्र पवार गटाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यावर आली. या गटाकडे आश्वासक असा मोठा नेता नाही, की सत्तास्थाने नाहीत; परंतु जुने ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी सोबत आहेत. हे कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका मांडत असताना संघटन वाढविण्यासाठी या गटाचे राज्य पातळीवरील नेते फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Chhatrapati Sambhajinagar Loksabha : खैरेंचं तिकीट आलयं; भाजपच्या डॉ. कराडांचे काय?...

भुदरगड तालुक्यात अजित पवार गट भक्कम आहे. तेथे माजी आमदार के. पी. पाटील नेतृत्व करत आहेत. कागल, गडहिंग्लज, आजरा तालुक्यात पालकमंत्री मुश्रीफ यांचा, तर चंदगडमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा प्रभाव आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर पन्हाळ्याचा गड सांभाळत आहेत. मानसिंगराव गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड शाहूवाडीमध्ये कार्यरत आहेत. राधानगरीमध्ये ए. वाय. पाटील यांचा चांगला प्रभाव आहे; पण शहरात या गटाकडे नेताच नाही. ही ताकद कायम ठेवून विस्ताराचे आव्हान पेलावे लागणार आहे.

त्या तुलनेत शरदचंद्र पवार गट (Sharad Pawar) हातकणंगलेमध्ये भक्कम असल्याचे चित्र असून, आमदार राजीव आवळे, जांभळे पिता-पुत्र, माजी नगरसेवक मदन कारंडे कार्यरत आहेत. चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांमध्ये या गटाचे अस्‍तित्व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर यांनी टिकवून ठेवले आहे. सर्व तालुक्यांमध्ये या गटाला भक्कम संघटन करून ताकद वाढवावी लागणार आहे.

पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांचेच दुर्लक्ष

लोकसभा निवडणुकीचे प्रबळ उमेदवार नाहीत. तीन विधानसभा मतदारसंघ सोडले, तर अन्य मतदारसंघात उमेदवार शोधावे लागतील, अशी स्थिती आहे. दोन विद्यमान आमदारांसह काही दिग्गजांनीही पवार यांची सोडली साथ राहिलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या गटासमोरही आता आव्हानांचा डोंगर उभा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sharad Pawar, Ajit Pawar
Hemant Godse News : भाजप, भुजबळांच्या दाव्याने गोडसे आक्रमक; नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांकडेच ठोकला तळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com