Eco-Friendly and Affordable Transport for Daily Commuters : राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत नुकतीच परवानगी दिली आहे. आता या सेवेसाठी भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत. हा निर्णय तात्काळ लागू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 73 व 96 नुसार या सेवेचे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 10.27 रुपयांप्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाईल.
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा 1.5 किमी चा असुन प्राथमिक भाडे 15 रुपये इतके अनिवार्य असणार आहे. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान 15 रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना 10.27 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात ही सेवा केवळ मुंबई पुरतीच मर्यादीत असणार आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने सध्या उबेर इंडिया, रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन आणि अॅनी टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांना तात्पुरता “मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्रोव्हिजनल लायसन्स” मंजूर केला आहे. या परवान्याची मुदत 30 दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागणार आहे. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल.
याविषयी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल. प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. दरम्यान, ही सेवा मुंबईव्यतिरिक्त राज्यातील अन्य शहरांमध्ये कधी सुरू होणार, याबाबत परिवहन विभागाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.