
थोडक्यात महत्वाचे :
सुप्रीम कोर्टाने बिहारमधील मतदारयादी पुनर्पडताळणी (SIR) मोहिमेबाबत निवडणूक आयोगाला गंभीर इशारा दिला आहे.
SIR प्रक्रियेत जर थोडाही त्रुटी किंवा संविधानिक नियमांचे उल्लंघन आढळले, तर संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील अंतिम निकाल संपूर्ण देशासाठी लागू होणार असून पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
Impact of Voter List Irregularities in Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादी पुनर्पडताळणी (SIR) मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने भारतीय निवडणूक आयोगाला गंभीर इशारा दिला आहे. SIR ही मोहिमच रद्द करण्याबाबतचे विधान कोर्टाने केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले आहेत.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये SIR ही मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे घेत त्यांची पडताळणी केली जात आहे. कागदपत्रे नसलेल्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच SIR विरोधात सुप्रीम कोर्टातही अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीदरम्यान कोर्टाने या मोहिमेच्या कामात थोडी जरी गडबड आढळून आली तरी संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा इशारा कोर्टाने आयोगाला दिला आहे. आता यावर पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
कोर्टाने म्हटले की, SIR प्रक्रियेत संविधानिक सुरक्षेच्या उपायांबाबत समझोता केला गेला तर संपूर्ण प्रक्रिया अमान्य केली जाईल. बिहार SIR बाबत कोर्ट जो निकाल देईल, तो संपूर्ण भारतासाठी लागू होईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. आम्ही तुकड्या-तुकड्यांमध्ये आदेश देणार नाही. यावरील अंतिम निकाल देशासाठी असेल, असे कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, SIR प्रक्रियेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एकत्रितपणे बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता. या प्रक्रियेबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला इशारा दिला दिला आहे.
Q1: SIR मोहिम म्हणजे काय?
A: मतदारयादी पुनर्पडताळणी मोहिम ज्यामध्ये मतदारांची कागदपत्रे तपासली जातात.
Q2: सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला काय इशारा दिला?
A: प्रक्रियेत गडबड आढळल्यास संपूर्ण मोहिम रद्द केली जाईल, असा इशारा.
Q3: बिहारमधील या प्रकरणाचा परिणाम कुठपर्यंत होईल?
A: निकाल संपूर्ण भारतासाठी लागू होणार आहे.
Q4: पुढील सुनावणी केव्हा होणार आहे?
A: या प्रकरणावर पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.