Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

Maharashtra IPS Officer Transfers: इलेक्शन कमिशनचा फडणवीसांनी घेतला धसका; रात्रीतच 44 आयपीएस अधिकाऱ्यांची 'ट्रान्सफर'

Deepak Kulkarni

Maharashtra Police Officer Transfers:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृहविभागाकडून तब्बल 44 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुणे,जालना, नागपूर यांसह विविध शहरांचे पोलीस अधिकारी बदलले गेले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची राज्य होमगार्डचे महासमादेशकपदी बढती झाली आहे.आता त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयपीएस(IPS) आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकीकडे राज्यातील 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून दुसरीकडे 44 आयपीएस अधिकारी बदलले गेले आहेत. शासनाच्या गृह विभागाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रविंद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात प्रशासनाने मोठे फेरबदल केले असून राज्यातील 32 वरिष्ठ पोलीस(police) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत.

गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना बढती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गेले दोन महिने पुण्याचे पुणे पोलिस दलातील सह पोलिस आयुक्तपद रिक्त होते. त्याजागी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे आहेत ट्रान्सफर झालेले अधिकारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT