CM Devendra Fadnavis sarkarnama
प्रशासन

Maharashtra government news : राज्यातील 15 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली खुशखबर; सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी

NHM Maharashtra news, NHM contract employees : निर्माण करण्यात येणारी अधिसंख्य पदे व्यक्ती सापेक्ष असून समकक्ष पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यास ते पद व्यपगत होईल.

Rajanand More

Contract employees Maharashtra : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या तब्बल १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सरकारकडून मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तांत्रिक खंड १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

राज्यात असे १५ हजार १० कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक ११५३.६० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या २५ जून रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत जीआर मंगळवारी काढण्यात आला आहे.

एक वेळची विशेष बाब म्हणून नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे. एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ते सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी पदाची सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य व ग्राम विकास विभागात उपलब्ध नियमित मंजूर पदांशी समकक्षता निश्चित करून संबंधित वेतनश्रेणी निश्चित करण्याबाबत आरोग्य विभागाकडून वित्त विभागाची मान्यता घेतली जाईल.

कार्यरत कंत्राटी पदांसाठी समकक्षतेनुसार वेतनश्रेणी ठरविण्यासाठी या विभागात नियमित मंजूर पद उपलब्ध नसल्यास इतर विभागांतील तुलनात्मक समकक्ष पदांची तपासणी करून वेतनश्रेणी निश्चित केली जाईल. वेतनकक्षेणी निश्चित करताना समकक्ष पदांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी विचारात घेण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.

अनुकंपाचा लाभ नाही

निर्माण करण्यात येणारी अधिसंख्य पदे व्यक्ती सापेक्ष असून समकक्ष पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यास ते पद व्यपगत होईल. या अधिसंख्य पदावर नवीन नियुक्ती करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना पूर्वी केलेल्या कंत्राटी सेवेसंदर्भात कोणतेही लाभ मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्तावरील नियुक्तीही दिली जाणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT