IAS officer controversy : उपजिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला, थेट भाजप नेत्यासोबत धक्काबुक्की; IAS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

Rinku Singh Rahi transfer, Jalaun SDM news : रिंकु सिंह हे २०२५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहजहांपूरमधील पुवाया येथे एसडीएम म्हणून रुजू झाले होते.
IAS Rinku Singh Rahi transfer
IAS Rinku Singh Rahi transferSarkarnama
Published on
Updated on

BJP leader controversy : सतत वादाच्या भोवऱ्या अडकणारे IAS अधिकारी रिंकु सिंह राही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका भाजप नेत्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या दोघांमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

रिंकु सिंह हे उत्तर प्रदेशातील जालौनचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ता. २३ जून रोजी ते बेतवा आइस अॅन्ड कोल्ड स्टोरेजची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी भाजपचे ब्लॉक प्रमुख रामराजा निरंजन हेही उपस्थित होते. काही मुद्द्यांवर दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. निरंजन यांच्याकडून घटनेचे मोबाईलध्ये रेकॉर्डिंग केले जात होते.

दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर IAS अधिकारी सिंह यांचा संयम सुटला. त्यांनी थेट निरंजन यांच्या हातातील मोबाईल पाडला. त्यानंतर त्यांना दोन्ही हातांनी जोरदार धक्का दिला. हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. निरंजन यांनी सोमवारी (ता. २९) याबाबत व्हिडिओ समोर आणत सिंह यांच्यावर कारवाईची मागणी केली. सिंह यांनी आपल्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा निरंजन यांनी केला आहे.

IAS Rinku Singh Rahi transfer
Aditya Thackeray news : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात; एकनाथ शिंदेंकडून फुलप्रूफ तयारी

निरंजन यांनी याप्रकरणी जालौनचे जिल्हाधिकारी राजेश कुमार पांडेय यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पांडेय यांनी पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. दरम्यान, पांडेय यांनी मंगळवारी रिंकु सिंह यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना उरईच्या एसडीएम (कायदा-सुव्यवस्था) पदावर पाठविण्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच रिंकु सिंह यांच्याविरोधात भाजप आमदार गौरीशंकर वर्मा यांनी तक्रार केली होती.

IAS Rinku Singh Rahi transfer
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सर्वात विश्वासू आमदाराला फोडले, थेट उपसभापती पदासाठी भरला अर्ज

सिंह यांनी पाठवले होते राष्ट्रपतींना पत्र

रिंकु सिंह हे २०२५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहजहांपूरमधील पुवाया येथे एसडीएम म्हणून रुजू झाले होते. काही महिन्यांपूर्वीच वकिलांशी झालेल्या वादानंतर त्यांनी उठाबशा काढल्या होत्या. या घटनेनंतर त्यांची लखनौ येथील महसूल परिषदेत बदली करण्यात आली होती. मात्र, तिथे फारसे काम नसल्याचा दावा करत त्यांनी २६ मार्च २०२६ रोजी थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठविला होता. काम करण्याची संधी मिळत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com