Maharashtra Police Bharti Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Interim Budget 2024 : पोलिसांची 17 हजार पदे भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे आणि अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Ganesh Thombare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या. यामध्ये राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दवोसमध्ये 19 कंपन्यांबरोबर करार झाले असून त्यांचा राज्याला मोठा फायदा होईल, असंही पवार यांनी सांगितलं. (Maharashtra Interim Budget 2024 )

तसेच महाराष्ट्रात येत्या काळात पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. याबरोबरच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जम्मू-काश्मीर-अयोध्येत महाराष्ट्र भवन

राज्यातील पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी जम्मू-काश्मीर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले. या ठिकाणी राज्य सरकारने जागा उपलब्ध केली असून यासाठी तब्बल 77 कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

खेळाडूंसाठी मोठी तरतूद

आजच्या अर्थसंकल्पात खेळाडूंसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. यापुढे आता खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आशियाई स्पर्धेत मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंच्या पारितोषिकांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सुवर्णपदाकासाठी एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 75 लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT