Maharashtra Interim Budget 2024: कॉन्ट्रॅक्टर जोमात अन् शेतकरी कोमात; 'अर्थसंकल्पा'वर ठाकरेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या. राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या बरोबरच या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. (Maharashtra Assembly budget session)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 6 लाख 522 कोटींची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प आज मांडला. या अर्थसंकल्पानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जोमात अन् शेतकरी कोमात, असा हा अर्थसंकल्प असल्याचं ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Maharashtra Budget 2024: सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेतली : उद्धव ठाकरे

"हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प आहे. यामध्ये घोषणा झाल्यानंतर टेंडर मिळणारे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात, अशी परिस्थिती आहे. मग याआधी पहिल्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्याचं काय झालं ? नवीन काहीतरी बोलायचं आणि मृगजळाच्या पाठी धावायला लावायचे", अशी टीका ठाकरेंनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले. त्याचे काय झाले, त्याची गॅरंटी कोण घेणार ? पुढील पाठ आणि मागील सपाट, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला.

जयंत पाटील काय म्हणाले ?

सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात हजारो कोटींच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण राज्य सरकारने फक्त निवडणुकीकडे पाहून लोकांना काहीतरी देणार आहोत, अशा प्रकारच्या या फक्त घोषणा केल्या आहेत. अंतरिम बजेट हे नार्मल असतं. पण त्यापुढे जाऊन अशा प्रकारे मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या सरकारची प्रतिमा ढासळली असल्यामुळे यातून सावरण्यासाठी हा अर्थसंकल्प मांडला आहे, अशा शब्दात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर टीका केली.

(Edited By-Ganesh Thombare)

Uddhav Thackeray
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com