Police Bharti   sarkarnama
प्रशासन

Video Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू,राज्यात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज

Maharashtra Police Recruitment Latest Updates : राज्यातून 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त  झाले असून 19 जूनपासून ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली.

Sudesh Mitkar

Mumbai News : महाराष्ट्र पोलीस दलात एकूण १७ हजार पदे रिक्त आहेत. या पदांसाठी राज्यातून 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले असून 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली.

महाराष्ट्रात 19 जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरूवात होतं असून 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज मिळाले आहेत. तुरुंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून त्यासाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून त्यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज हे पोलीस शिपाई पदासाठी आले आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज प्राप्त झाले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार रिंगणात असणार आहेत.

शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 पदांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण असल्याने भरती प्रक्रिया सुरु असताना पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार आहे. तसेच उमेदवारानं एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित आहे.

कोल्हापूर येथील पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.धाराशिव मध्ये पोलीस शिपायाच्या 99 जागा तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होत आहे. चालक पदासाठी 4503 अर्ज दाखल झाले आहेत. तर 3497 अर्ज पोलीस शिपाई या पदासाठी दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले असून 21 जूनपासून नेहुली येथील क्रिडा संकुलात भरती पार पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT