Maharashtra Police Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Police : आनंदाची बातमी! महाराष्ट्र पोलीस दल होणार आधुनिक, मोदी सरकारकडून योजनेला मंजुरी

Devendra Fadnavis news : देशातील विविध राज्यांतील पोलीस दलांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम मानले जाते. आता या योजनेमुळे महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणेची साथ लाभणार आहे.

Rajanand More

Police Modernization Plan : महाराष्ट्र पोलीस दलासाठी आनंदचा बातमी आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे नागरिकांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर अधिक भर देणे शक्य होणार आहे. तसेच पोलिसांनाही अत्याधुनिक शस्त्रे मिळणार आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणेची उभारणी करणेही शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियातून केंद्र सरकारच्या मंजुरीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये दिली आहे.

दरम्यान, देशातील विविध राज्यांतील पोलीस दलांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम मानले जाते. आता या योजनेमुळे महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणेची साथ लाभणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्याचा शोध करणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यातून आधुनिक यंत्रणा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे गुन्हे टाळणे, गुन्हेगारावर खटले भरणे, खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेला संरक्षण देणे, वाहतूक सुव्यवस्था, स्फोटक पदार्थांची तपासणी, सायबर फसवणुकीला आळा घालणे, त्यातील गुन्हेगारांचा शोध घेणे, एआय तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरातून गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला मोठा निधी दिला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT