Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

MPSC Exam Pattern Change : 'MPSC' परीक्षेला आता 'UPSC' लूक; मुख्यमंत्री फडणवीसांचे आयोगाच्या पुनर्रचनेचे संकेत

Maharashtra Public Service Commission exams UPSC pattern CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घेतल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीने होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Pradeep Pendhare

MPSC Exam Latest News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्‍या स्पर्धा अधिक शिस्तीच्या आणि आव्हानात्मक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 पासून लोकसेवा आयोगाकडून घेण्याच्या परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 12 नोव्हेंबर 2024 च्या पत्रान्वये 617 उमेदवाराची सरकारने शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर 540 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहे".

महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थी हा 'UPSC'सोबत 'MPSC'ची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर 'MPSC'ला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग 1, 2 अन् 3 ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे स्वरूप 2022 मध्ये बदलणार होते. परंतु स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे तीन वर्षांचा वेळ मागितला होता. राज्य सरकारने त्यावेळी काहीशी माघार घेत ‘एमपीएससी’ने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर आता निर्णय घेतला असून, आता 2025पासून परीक्षा पद्धती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होईल. या सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे निरीक्षक तज्ञांनी वर्तवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT