Cm Uddhav Thackeray, Amit Shah

 
Sarkarnama
प्रशासन

गुड गव्हर्नन्स! मोदी सरकारची महाराष्ट्राच्या पाठीवर थाप

महाराष्ट्राचे कृषी आणि संलग्न क्षेत्रे, मानव संसाधन, सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये चांगले काम.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : सुशासन दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी देशभरातील सुशासित राज्यांची यादी जाहीर केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस (२५ डिसेंबर) सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने कृषी आणि संलग्न क्षेत्रे, मानव संसाधन, सार्वजनिक पायाभूत सुविधा, समाज कल्याण आणि विकास या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या यादीमध्ये सरकारी कार्यालयात सुशासनाच्या बाबतीत गुजरात (Gujrat) राज्याने प्रथम क्रमांक मिळवला पटकावला आहे. या गुड गव्हर्नन्स इंडेक्समध्ये महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या तर गोवा (Goa) तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोव्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान, मिझोराम, जम्मू-काश्मीर या राज्यांचा क्रमांक लागतो.

राज्यांमध्ये गुजरातप्रमाणेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजधानी दिल्लीनेही अव्वल स्थान पटकावले आहे. २०१९च्या तुलनेत गुजरातने गेल्या वर्षभरात १२. ३ टक्क्यांची वाढ नमूद केली आहे. त्यामध्ये आर्थिक प्रशासन, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक सोयीसुविधा, समाज कल्याण आणि विकास, न्यायव्यवस्था, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे सांगितले आहे. १० क्षेत्र आणि त्यातील ५८ निर्देशांकांची तपासणी केल्यानंतर ही यादी प्रसिध्द केली जाते.

शेती आणि जोडधंदे, व्यापार आणि उद्योग, सार्वजनिक सोयीसुविधा, आर्थिक प्रशासनस समाजकल्याण आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये गोवा राज्यानं चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. गोव्याने या वर्षी तब्बल २४.७ टक्क्यांची वाढ नोंदवत मोठी झेप घेतली आहे. गुजरातने आर्थिक प्रशासन, मानव संसाधन विकास, सार्वजनिक पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण आणि विकास, न्यायिक आणि सार्वजनिक सुरक्षा यांमध्ये चांगली कामगिरी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT