SSC Result 38,437 Students Fail Marathi Across Maharashtra Sarkarnama
प्रशासन

Marathi Language: अभिजात दर्जा मिळाला पण, मायभूमीतच मराठी ठरतेय अडचणीची? दहावीत 38 हजार विद्यार्थी नापास

SSC Result 38,437 Students Fail Marathi Across Maharashtra: 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असं म्हणणाऱ्या राजकीय नेते, सर्व नागरिकांसाठी मराठीची ही दुरवस्था दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं आत्मपरिश्रण करण्याची वेळ आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आपण काही महिन्यापूर्वी साजरा केला. पण मराठीच्या मायभूमीतच मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषाच अडचणीत ठरत असल्याचे दिसते. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात तब्बल 38 हजार विद्यार्थी नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा कठीण जाते, हे लाजीरवाणं वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे. इंग्रजीत 6 हजार 738 विद्यार्थी नापास झाले आहेत तर मराठी 38 हजार 437 विद्यार्थी नापास झाले आहेत.

महाराष्ट्रात सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती केली असली तरी खुद्द मराठी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठीविषयीची पात्रता काय आहे, याकडे मराठी भाषा, मराठी विषयी जाण असलेल्या प्रत्येकाला डोळेझाक करुन चालणार नाही.

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असं म्हणणाऱ्या राजकीय नेते, सर्व नागरिकांसाठी मराठीची ही दुरवस्था दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं आत्मपरिश्रण करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर देण्यात आला असला तरी मातृभाषेचं काय? असा प्रश्न आता भाषातज्ज्ञ विचारीत आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

छत्रपती संभाजी नगर विभागीय मंडळात दहावीत ३६ विषयांमध्ये विभागात १ लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ लाख ५६ हजार २२५ विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठीची निवड केली होती. यातील ९३.९३ टक्के म्हणजे १ लाख ४६ हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ९ हजार ४८६ विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT