
दशहतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच राहणार आहे. आवश्यकता वाटल्यास ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने दिले आहे. या मोठ्या घोषणेनंतर मोदी सरकार आपल्या संरक्षण विभागाचा बजेट वाढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
संरक्षण विभागाला अतिरिक्ती निधी लवकरच देण्यात येणार आहे. सैन्यदलाची गरज, शस्त्र खरेदी, संशोधनासाठी हा निधी वापरला जाणार आहे. नवी शस्त्रे, दारु-गोळा खरेदी,आधुनिक तंत्रज्ञान यावर खर्च करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त निधीच्या माध्यमातून 50 हजार कोटी रुपये संरक्षण विभागाला देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या निधीला मंजुरी दिली जाऊ शकते.
या वर्षांचा संरक्षण खात्याचा बजेट हा 6.81 लाख कोटी रुपये आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दहा वर्षांतील सर्वात जास्त निधी हा संरक्षण खात्याला देण्यात आला आहे. अन्य खात्यापेक्षा सर्वात जास्त आर्थिक तरतूद संरक्षण खात्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.2014-2015 चा बजेट 2.29 लाख कोटी रुपये होता.
भारत-पाक तणावात गेल्या 7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानात हवाई हल्ले करुन दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धस्त केले आहेत. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मोठ्या संख्येत दहशतवादी जखमी झाले आहेत.ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच राहणार आहे.
गुरूवारी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्याशी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी फोनवरून संवाद साधला. अफगाणिस्तानने भारताच्या मैत्री पर्वाचं जोरदार स्वागत केलं आहे. भारत हा कायमस्वरूपी आपला मित्र असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाल्याचे एस.जयशंकर यांनी सांगितले आहे. खोट्या बातम्या पसरवून भारत आणिअफगानिस्तानमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचे जयशंकर यांनी एक्स वर सांगितले होते. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा अफगानिस्तानने उघडा केला आहे. यासाठी जयशंकर यांनी अफगानिस्तानचे आभार मानले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.