Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar Sarkarnama
प्रशासन

Mahayuti Govt : महायुती सरकारचा मोठा निर्णय; जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित अन्‌ विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

District Planning Committee cancelled : राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून म्हणजे तत्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 January : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) संदर्भात राज्य सरकारने आज (ता. 28 जानेवारी) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने (तत्काळ) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपल्या इच्छांना नव्याने निवड होईपर्यंत मुरड घालावी लागणार आहे.

जिल्हा नियोजन समिती (DPC) ही जिल्ह्याच्या विकास निधीची गंगा समजली जाते. नियोजन समितीच्या बैठकीत कोणाला किती निधी द्यायचा, हे ठरते. संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होत असते. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार हे नियोजन समितीचे सदस्य असतात, त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारचे (State Government) उपसचिव नितीन खेडकर यांंनी याबाबतचे परिपत्रक आज जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून म्हणजे तत्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागील सरकारच्या काळात झालेल्या नियुक्त् झालेल्या सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सरकार बदलल्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही नव्याने होतात. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडी होतात. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य मिळते, त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त्यांसाठी सत्ताधारी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असते. आतातही महायुती सरकारमध्ये नियोजन समितीवर जाण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

सोलापूर डीपीसीची 30 जानेवारीला बैठक

सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक येत्या गुरुवारी (ता. 30 जानेवारी) होणार आहे. त्या बैठकीला आपल्याला उपस्थित राहता येईल, या खुशीत मागील वेळी नियुक्त करण्यात आलेले सदस्य होते. मात्र, राज्य सरकारने आज तातडीने आदेश काढून जुन्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत, त्यामुळे जुन्या सदस्यांना या डीपीसीच्या बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT