Pravin Darekar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राज्य सरकार कधी भूमिका घेणार? भाजप आमदार दरेकरांनी वेळ सांगितली

BJP MLA Pravin Darekar Minister Dhananjay Munde Beed Santosh Deshmukh murder case : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरातून दबाव वाढला असतानाच, त्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभय मिळाल्यानंतर हा दबाव अधिकच वाढला आहे. या सगळ्यात राज्य सरकारची भूमिका काय राहणार, यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी 'मोठी' प्रतिक्रिया दिली.

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, "मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. आरोपींबरोबर त्यांचे लागेबांधे असल्याचे पुरावे नाहीत. तसे ते सिद्ध देखील झालेले नाही. यातून अजितदादांनी (Ajit Pawar) मंत्री मुंडेंचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतलेली दिसते. परंतु नैतिकतेवर राजीनामा द्यायचा की नाही, द्यायचा याचा निर्णय मुंडेंना घ्यायचा आहे".

Pravin Darekar
Shrirampur News : काँग्रेस आमदाराची आरटीओ कार्यालयात 'गांधीगिरी'; अधिकारीही झाले 'खजील'!

'मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारच अंतिम भूमिका घेतली. तेच विधान करतील. यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. अजितदादांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल', असेही आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले.

Pravin Darekar
Dinvishesh 7 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

मंत्री मुंडे यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी

दरम्यान, मुंबईत आज मंत्रिमंडळाचा बैठक होत आहे. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे पोचले आहेत. तिथं त्यांनी माध्यमांशी बोलताना राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे म्हटले आहे. राजीनामा दिला असता, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीला आलो असतो का? असा प्रतिप्रश्न मंत्री मुंडेंनी केला.

आमदार धस यांना योग्यवेळी उत्तर देणार : मंत्री मुंडे

भाजप आमदार सुरेश धस या हत्येप्रकरणात गंभीर आरोप करत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत. यावर कसे पाहता आणि त्यांना कधी उत्तर देणार, यावर मंत्री धंनजय मुंडे यांनी योग्यवेळी सर्व उत्तरं देईल, असेही म्हटले आहे. अजित पवार यांच्या बंद केबिनमध्ये काल तासभर चर्चा केल्यानंतर मंत्री मुंडेंचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातानाची त्यांची देहबोली देखील सकारात्मक होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com