Empowering Women Entrepreneurs: Under Swarnima Yojana, backward class women can now avail loans up to ₹2 lakh at only 5% interest. 
प्रशासन

Swarnima Yojana: महिला उद्योजकांसाठी मोदी सरकारची भन्नाट योजना; कर्ज मिळणार फक्त ५ टक्के व्याजाने

What is Swarnima Yojana and who can apply? मागासवर्गीय महिलांसाठीची स्वर्णिमा योजना काय आहे, जाणून घ्या!

सरकारनामा ब्युरो

मागासवर्गीय घटकांमधील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारने स्वर्णिमा योजना सुरु केली आहे. या योजनेतून मागासवर्गीय महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे ही योजना राबविली जात आहे.

कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता उद्योग सुरु करण्यासाठी स्वर्णिमा योजना महिलांना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्टार्टअप इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. स्वर्णिमा योजनाही या दोन योजनांना पूरक ठरू शकते.

स्वर्णिमा योजनेद्वारे केंद्र सरकारच्या सुविधांचा लाभ घेत महिला उद्योजकांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल उचलता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता निकष, नियम व अटी जाणून घ्या!

स्वर्णिमा योजनेचे फायदे

  • अत्यंत कमी व्याजदरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळेल

  • मागासवर्गीय घटकांतील महिलांना उद्योजक बनून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची उत्तम संधी

  • समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्याची व स्वावलंबी होण्याची संधी

  • महिला सशक्तीकरणाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला चालना मिळणार

स्वर्णिमा योजनेची वैशिष्ट्ये

  • मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी मोदी सरकारची योजना

  • यातून महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त पाच टक्के वार्षिक दराने उपलब्ध होईल

  • स्वयंरोजगार निर्मितीसाठी ही योजना फायदेशीर आहे

  • स्वर्णिमा योजनेचा लाभ घेण्यापूर्वी महिलांना स्वत: भांडवल उभे करण्याची सक्ती नाही. म्हणजेच, दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायांसाठी आधी पैसे गुंतवावे लागणार नाहीत

स्वर्णिमा योजनेसाठी कोण असेल पात्र?

  • अर्जदार महिला असावी

  • अर्जदाराचे वय वर्षे १८ ते ५५ या दरम्यान असावे

  • महिलेची स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची तयारी असावी

  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे

स्वर्णिमा योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात?

  • आधार कार्ड

  • जात प्रमाणपत्र

  • शिधापत्रिका

  • रहिवासी प्रमाणपत्र

  • अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो

स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

  1. इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजनेचा अर्ज भरावा.

  2. अर्जामध्ये व्यवसायाची आवश्यक माहिती, संकल्पना आणि प्रशिक्षणाची गरज असल्यास ते नमूद करा

  3. अर्ज भरून राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT