Monika Thakur  Sarkarnama
प्रशासन

Monika Thakur transfer : वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची नागपूरला झालेली बदली सहा दिवसांतच रद्द; पदभार स्वीकारल्यानंतर सरकारने दिला झटका

Nagpur transfer news, Maharashtra government transfers : मोनिका ठाकूर या २००२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (उपजिल्हाधिकारी संवर्ग) परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या आहेत.

Rajanand More

Maharashtra Revenue Department news : राज्याच्या महसूल विभागाने वरिष्ठ अधिकारी मोनिका सुरजपालसिंह ठाकूर यांची सहा दिवसांपूर्वीच करण्यात आलेली बदली रद्द केली आहे. विशेष म्हणजे ठाकूर यांनी बदलीनंतर नव्या पदाचा कार्यभारही स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर पाचव्याच दिवशी विभागाने त्यांची बदली रद्द केली आहे. त्यांना सध्यातरी कुठल्याही पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांनी ६ नोव्हेंबरला नागपूर येथे अपर जिल्हाधिकारी पदावर बदली केली होती. हे पद प्रवीण रत्नाकर महिरे यांच्या बदलीमुळे रिक्त झाले होते. त्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती.

ठाकूर या अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष होत्या. बदलीनंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी नागपुरात अपर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. पण त्यानंतर शुक्रवारी महसूल विभागाने ठाकूर आणि महिरे यांच्या बदलीचा आदेश रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

शासन निर्णयामध्ये प्रशासकीय कारणास्तव या पदस्थापना रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. महिरे यांना आधीच्या म्हणजे अपर जिल्हाधिकारी या पदावर पुन्हा पदस्थापना देण्यात आली आहे. तर ठाकूर यांना मात्र कोणतेही पद देण्यात आलेले नाही. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जातील, असे महसूल विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, ठाकूर आणि महिरे यांच्या बदल्या अचानक रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. ठाकूर या २००२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (उपजिल्हाधिकारी संवर्ग) परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार सांभाळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT