

Rahul Gandhi vs PM Narendra Modi update : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपला फोन पंतप्रधान मोदींकडून टॅप केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण करत असलेल्या आरोपांचे सर्व पुरावे फोनमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांनी चर्चेचे आव्हान दिले आहे.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी इन्स्टाग्रामवर 'ASK ME' या उपक्रमांतर्गत तरुणाईशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यादरम्यान त्यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले आहे की, मी केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहे. ते पंतप्रधानांकडून टॅप केले जात आहेत.
समोरासमोर चर्चा केली तर परदेशी शक्तीच्या इशाऱ्यांवर कोण काम करत आहे, हे सिध्द होईल. देशविरोधी कोण आहे आणि कधीपासून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे? यांसारखी आणखी माहिती माझ्या फोनमध्ये असल्याचा दावाही राहुल यांनी केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना चर्चेचे आव्हान देतानाच त्यांची आपल्यासोबत समोरासमोर चर्चा झाली तर ते पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
भाजप संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहे, पण तुन्ही सार्वजनिक चर्चेवर का जोर देताय, या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, लोकसभेत आपल्याला बोलू दिले जात नाही. माइक बंद केला जातो. मला कृषी कायदे, मतचोरी, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांचे पुस्तक, एपस्टीन आदी मुद्दयांवर बोलू दिले नाही. मला लांबलचक भाषणे नको आहेत. थेट चर्चा हवी, ज्यामध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करू शकतात.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदी एका बाजूला आणि दुसरीकडे मी, अशी चर्चा व्हावी. दोघांमध्ये प्रश्नोत्तरे व्हायला हवीत. चर्चेसाठी गौतम अदानी किंवा मोहन भागवत यांना जज बनविले तरी मला काहीही अडचण नाही, असे सांगत राहुल यांनी पुन्हा एकदा चर्चेचे आव्हान दिले. चर्चा झाली तर पंतप्रधान गद्दार आहेत, हे मी पाच मिनिटांत सिध्द करेन, असा दावाही राहुल यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.